ओला इलेक्ट्रिक आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन फिचर घेउन आले आहे. ज्याअंतर्गत तुम्ही तुमची इलेक्ट्रिक स्कूटर मोबाईलमधील एका ॲपव्दारे लॉक करु शकणार आहात. सुरुवातीच्या वाहनांना ही सुविधा देण्यात आलेली नव्हती त्यामुळे कंपनीने हे फिचर अपडेट करुन उपलब्ध केले आहे.
इलेक्ट्रिक स्कूटर्स
Image Credit source: tv9
Follow us on
मुंंबई : ओला इलेक्ट्रिकच्या (Ola Electric) ग्राहकांना आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या (electric scooter) सुरक्षेमध्ये अधिक वाढ करण्यासाठी एक फिचर उपलब्ध होणार आहे. ओला इलेक्ट्रिक्सने आपल्या ग्राहकांसाठी एक मोबाईल ॲपची (mobile app) निर्मिती केली आहे. ज्याव्दारे तुम्ही मोबाईलचा वापर करुन तुमची इलेक्ट्रिक स्कूटर लॉक करु शकणार आहात. ओला इलेक्ट्रिक लवकरच आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर एस1 आणि एस1 प्रो वर आपले पहिजे ओटीए म्हणजेच ओव्हर द एअर अपडेट करणार आहे. इलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनीने सांगितले की, ते आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये हे मिसिंग फिचर लवकरच उपलब्ध करुन देणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक दुचाकींच्या सुरक्षेत अधिक वाढ होणार आहे.
ओला इलेक्ट्रिकचे फाउंडर आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी ओला ॲपचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी सांगितले आहे, की ओलाचे स्कूटर ॲप लवकरच ॲक्टिव्ह होणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक स्कूटरच्या सेफ्टी फिचरमध्ये अजून भर पडणार आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही मोबाईलव्दारे तुमची इलेक्ट्रिक स्कूटर लॉक करु शकणार आहात. दरम्यान, जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर करत नसाल तर स्कूटरला लॉक करण्यासाठी ॲप लॉक सुविधेला कसे अक्टिव्हेट केले पाहिजे, याबाबत ॲप लॉकच्या आधी ओला इलेक्ट्रिकने खुलासा केला होता. त्यानुसार, त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर एस1 आणि एस1 प्रोमध्ये हे सॉफ्टवेअर अपडेट मिसिंग होते.
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लाँच झाल्यानंतर एस1 आणि एस1 प्रो इलेक्ट्रिक स्कूटरसाठी हा पहिला ओटीए अपडेट आहे. कंपनी स्कूटरमध्ये आणखी काही स्पेसिफिकेशन्स ॲड करणार असून, त्यात ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी, नेव्हीगेशन आणि क्रूज कंट्रोल सारख्या फिचर्सचा समावेश आहे. ओला इलेक्ट्रिकने नवीन अपडेट होत असलेल्या आपल्या सर्व सुविधांची एक यादी तयार केली आहे. दरम्यान ओला इलेक्ट्रिकच्या ग्राहकांना हिल होल्ड कंट्रोल आणि हाईपर मोड सारख्या काही सुविधांसाठी अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. वरुण दुबे यांनी नुकतेच, सांगितले होते की, यातील काही अपडेट्स या वर्षी जूनच्या अगोदर होण्याची शक्यता आहे.