बग शोधणाऱ्या हॅकर्सना फेसबूक बक्षीस देणार, Meta कडून बग बाउंटी प्रोग्रामची घोषणा

| Updated on: Dec 16, 2021 | 5:54 PM

META (Facebook चे नवीन नाव) ने त्यांचा बग बाउंटी कार्यक्रम वाढवला आहे, जेणेकरुन स्क्रॅप केलेल्या डेटामध्ये त्रुटी आणि बग शोधल्याबद्दल रिसर्चर्सना (संशोधकांना) बक्षीस देता येईल.

बग शोधणाऱ्या हॅकर्सना फेसबूक बक्षीस देणार, Meta कडून बग बाउंटी प्रोग्रामची घोषणा
Meta
Follow us on

मुंबई : META (Facebook चे नवीन नाव) ने त्यांचा बग बाउंटी कार्यक्रम वाढवला आहे, जेणेकरुन स्क्रॅप केलेल्या डेटामध्ये त्रुटी आणि बग शोधल्याबद्दल रिसर्चर्सना (संशोधकांना) बक्षीस देता येईल. डेटा स्क्रॅपिंग म्हणजे मेटा मास वापरकर्त्यांच्या प्रोफाइलवरून वैयक्तिक डिटेल्स जसे की प्रोफाइल फोटो, ईमेल अॅड्रेस आणि फोन नंबर कशा पद्धतीने कलेक्ट करतं. जे संशोधक स्क्रॅप केलेल्या डेटामध्ये बग शोधू शकतील आणि स्क्रॅपिंग अॅक्टिव्हिटी इनेबल करु शकतील त्यांना बग बाउंटी प्रोग्राम अंतर्गत पुरस्कृत केले जाईल. (Meta expands bug bounty programme to include data scraping and give reward to researchers)

Engadget च्या एका अहवालात सिक्योरिटी इंजिनियरिंग मॅनेजर डॅन गुरफिंकेलच्या हवाल्याने म्हटले आहे की, “आम्ही अशा त्रुटी शोधत आहोत जे अटॅकर्सना डेटा अॅक्सेस करण्यासाठी स्क्रॅपिंग मर्यादा बायपास करण्यात मदत करतात.” मेटाने सांगितले की डेटा स्क्रॅपिंगसाठी बग बाउंटी प्रोग्राम सुरू करणारी ही पहिली कंपनी आहे.

डेटा स्क्रॅपिंगसह, मेटा सारख्या कंपन्या वेगवेगळ्या वेबसाइटवरून वैयक्तिक तपशील (डिटेल्स) काढतात. या तपशीलाचा मोठा भाग वापरकर्त्यांनी स्वेच्छेने वापरत असलेल्या वेबसाइटवर प्रदान केला असल्यास, ते सर्चेबल डेटाबेसमध्ये तपशील शेअर करण्यासह, डेटा स्क्रॅपिंग डिटेल्स फॉरवर्ड करण्यास परवानगी मिळते.

डेटा स्क्रॅपिंग काय आहे ते समजून घ्या

डेटा स्क्रॅपिंग ही एक उद्योग-व्यापी अॅक्टिव्हिटी आहे जिथे युजर्सचे वैयक्तिक डिटेल्स वेगवेगळ्या पार्टींसोबत शेअर केले जातात आणि मेटा देखील त्यातून सुटू शकत नाही. डेटा स्क्रॅपिंग हे एक व्यावसायिक धोरण आहे जे कायद्याच्या स्टँडर्ड्समुळे राबवले जाते. या प्रक्रियेत, कोणताही लीक झालेला डेटा परवानगीशिवाय हस्तांतरित केला जातो आणि हा बगचा परिणाम असू शकतो. संशोधकांनी हा बग शोधून दाखवावा आणि असे केल्याबद्दल त्यांना बक्षीस द्यावे, अशी मेटाची इच्छा आहे.

मेटा नुसार संशोधकांना “PII (पर्सनल आयडेंटिफिकेशन इन्फॉर्मेशन) किंवा सस्पीशियस डेटा (जसे की ईमेल, फोन नंबर, फिजिकल अॅड्रेस) सह कमीतकमी 1,00,000 अपडेटेड Facebook युजर्स रेकॉर्ड असलेले असुरक्षित किंवा सार्वजनिक डेटाबेस शोधण्यासाठी पुरस्कृत केले जातील.

मेटा प्रत्येक बग किंवा डेटासेटसाठी किमान $500 (38,000 रुपये) बक्षीस देईल.

इतर बातम्या

iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन

Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung ते Whirlpool, 5 स्टार रेटिंगवाल्या या सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्सना ग्राहकांची पसंती, किंमत 7400 रुपयांपासून

(Meta expands bug bounty programme to include data scraping and give reward to researchers)