मोबाईल नेटवर्क सेवा पुरवठादार जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांनी 3 जुलैपासून टॅरिफ प्लॅन बदलला. त्यांनी महिन्याचा रिचार्ज प्लॅन महाग केला. त्याविरोधात देशभरातील ग्राहकांनी संताप व्यक्त केला. या दरवाढीचा निषेध म्हणून ग्राहकांनी BSNL कडे मोबाईल नंबर पोर्ट केले. बीएसएनएलकडे ग्राहकांची रीघ लागली आहे. मोबाईल पोर्टेबिलिटीचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत निघाले. बीएसएनएलकडे ढुंकूनही न पाहणारे ग्राहक सुद्धा आता बीएसएनएलच्या यादीत आले आहे. सिम पोर्ट करण्यात भारतीयांनी नवीन जागतिक विक्रम केला आहे.
सिम पोर्ट करण्याची सुविधा
भारतीय दूरसंचार विभागाने (DoT) मोबाईल युझर्सला विना क्रमांक बदलता नेटवर्क पुरवठादार बदलण्याची सुविधा दिली आहे. म्हणजे ग्राहक जिओचे सिम वापरत असेल तर त्याला त्याच्या आवडीनुसार, दुसर्या कंपनीची सेवा घेता येते. त्याला दूरसंचार पुरवठादार बदलता येतो.
आकड्यांनी दिपतील डोळे
दूरसंचार विभागाने दिलेल्या अहवालानुसार, रिचार्ज महागल्यानंतर ग्राहकांनी त्याला सिम पोर्टने उत्तर दिले. कंपन्यांनी 3 जुलै रोजी रिचार्ज प्लॅन महागले. 6 जुलै रोजीपर्यंत मोबाईल नंबर पोर्टबिलिटी सेवाने 100 कोटींचा आकडा पार केला. MNP सेवा भारतात 20 जानेवारी 2011 रोजी सुरु झाली होती. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानुसार, (TRAI) भारतात सरासरी प्रत्येक महिन्याला जवळपास 1.1 कोटी मोबाईल सिम पोर्ट करण्यासाठी विनंती येते.
ट्रायच्या आकडेवारीनुसार, 6 जुलै, 2024 रोजी भारताने पोर्टिबिलिटीमध्ये नवीन रेकॉर्ड केला आहे. भारताने आतापर्यंत 100 कोटींचा आकडा गाठला. मे 2024 मध्ये 1.2 कोटी मोबाईल क्रमांक पोर्ट करण्यात आले होते. मोबाईल नंबर पोर्ट करण्यासाठी ग्राहकांना 7 दिवसांची प्रतिक्षा करावी लागते.
खासगी कंपन्यांनी किती वाढवले दर
खासगी कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या दरात मोठी वाढ केली. प्लॅनचे दर 11% ते 25% वाढविण्यात आले. एअरटेल, व्होडाफोनचे 28 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन यापूर्वी 199 रुपयांना होता. तर जिओचा प्लॅन 189 रुपये होता. त्या तुलनेत बीएसएनएलचा प्लॅन फक्त 108 रुपयांमध्ये आहे. तसेच 107 रुपये ते 199 रुपयांपर्यंत बीएसएनएलचे 4-5 प्लॅन आहेत. ते इतर कंपन्यांच्या प्लॅनच्या तुलनेत स्वस्त आहेत. खासगी दूरसंचार कंपन्यांनी रिचार्ज प्लॅन वाढवल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर तर या कंपन्यांच्याविरोधात मोहिमच सुरु झाली आहे. बीएसएनएल सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.