मुंबई : मोटोरोलाने अखेर मोटो एज 20 (Moto Edge 20) आणि मोटो एज 20 फ्यूजन (Moto Edge 20 Fusion) भारतीय बाजारात लॉन्च केले आहेत. मोटोरोलाने गेल्या महिन्यात युरोपीय बाजारात Edge 20 सिरीज अधिकृतपण लाँच केली होती, ज्यात मोटो एज 20, मोटो एज 20 लाइट, मोटो एज 20 प्रो यांचा समावेश आहे. तथापि, मोटोरोलाने भारतात फक्त दोन मॉडेल्स लाँच केले आहेत आणि मोटो एज 20 प्रो वगळला आहे, जे लाइन मॉडेलमध्ये सर्वात टॉप व्हेरिएंट होतं. मोटो एज 20 फ्यूजन ही मोटो एज 20 लाइटची रीब्रांडेड आवृत्ती आहे, कारण दोन्ही स्मार्टफोनचे स्पेक्स कमी – अधिक प्रमाणात सारखेच आहेत. (Moto Edge 20, Moto Edge 20 Fusion launched in India, check price and feture)
मोटो एज 20 ची बाजारात वनप्लस नॉर्ड 2, विवो व्ही 21 आणि ओप्पो रेनो 6 या स्मार्टफोनशी टक्कर होईल. दुसरीकडे, मोटो एज 20 फ्यूजन Nord CE, Samsung M42, Mi 10i आणि अगदी Redmi Note 10 Pro Max शी स्पर्धा करेल. मोटो एज 20 आणि मोटो एज 20 फ्यूजन मिड-बजेट रेंजमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. दोन्हीमध्ये AMOLED डिस्प्ले आणि 108 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे.
मोटो एज 20 चे 8GB वेरिएंट 29,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आले आहे. दुसरीकडे, मोटो एज 20 फ्यूजन 6 जीबी व्हेरिएंट 21,499 रुपये आणि 8 जीबी रॅम +128 जीबी व्हेरिएंट 22,999 रुपये या किंमतीत लाँच करण्यात आले आहेत. मोटो एज 20 दोन रंगांमध्ये येतो ज्यात फ्रॉस्टेड पर्ल आणि फ्रॉस्टेड एमराल्डचा समावेश आहे. तर मोटो एज 20 फ्यूजन इलेक्ट्रिक ग्रेफाइट आणि सायबर टील या दोन रंगांमध्ये येतो. मोटो एज 20 चा पहिला सेल 24 ऑगस्टला होईल आणि मोटो एज 20 फ्यूजन 27 ऑगस्टपासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल.
मोटो एज 20 मध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz इतका आहे. मोटो एज हा भारतातील सर्वात पातळ आणि सर्वात हलका 5G फोन असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G, 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. आपण ही स्पेस एक्सपांडदेखील करू शकता.
कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास, मोटो एज 20 मध्ये टेलिफोटो लेन्स आणि 30x डिजिटल झूमसह 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये अल्ट्रा-वाइड आणि मॅक्रो लेन्स देखील आहेत. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मोटो एज 20 मध्ये 4000mAh ची बॅटरी आहे, जी 30 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की हा फोन फक्त 10 मिनिटांत 8 तासांची पॉवर देऊ शकतो.
इतर बातम्या
कोरोना लसीबाबत अफवा पसरवणारे 100 हून अधिक अकाऊंट्स फेसबुककडून बॅन, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
(Moto Edge 20, Moto Edge 20 Fusion launched in India, check price and feture)