मुंबई : मोटोरोलाने या महिन्यात Moto Edge X30 हा फोन सादर केला होता, जो Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह येणारा पहिला स्मार्टफोन आहे. हा फोन फ्लॅगशिप मोबाईल आहे. यात 60 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. यात अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा मोबाईल भारतात जानेवारीमध्ये लॉन्च केला जाईल. 91 Mobiles ने आपल्या रिपोर्ट्समध्ये दावा केला आहे की हा Motorola फोन जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला भारतात सादर केला जाऊ शकतो. (Moto Edge X30 is ready to launch in India with snapdragon 8gen 1 soc and 60MP Selfie camera)
Motorola Moto Edge X30 त्याच्या खास फीचर्समुळे चिनी मार्केटमध्ये Xiaomi, Realme आणि OnePlus सारख्या इतर चिनी ब्रँड्सना जोरदार टक्कर देत आहे. या तिन्ही ब्रँडची भारतीय बाजारावर मजबूत पकड आहे. एवढेच नाही तर OnePlus हा फ्लॅगशिप लेव्हल ब्रँड बनत चालला आहे, ज्याने सॅमसंग आणि आयफोन सारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा सुरू केली आहे. दरम्यान, भारतात लाँच होणाऱ्या Motorola Edge X30 च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, या मोबाईलचे हार्डवेअर चीनमध्ये लॉन्च झालेल्या फोनसारखेच असेल.
Motorola Edge X30 च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, चीनमध्ये लॉन्च केलेल्या व्हेरिएंटमध्ये 6.7-इंचाचा OLED डिस्प्ले आहे, जो फुल एचडी प्लस रिझोल्यूशनसह येतो. यासह, युजर्सना यात 144Hz चा रीफ्रेश रेट मिळेल, ज्याच्या मदतीने युजर्सना अधिक चांगला गेमिंग एक्सपीरियन्स आणि दमदार स्क्रोलिंग एक्सपीरियन्स मिळेल. हा डिस्प्ले HDR 10 Plus ला देखील सपोर्ट करतो, ज्यामुळे Netflix सह कोणत्याही व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर येणारा कंटेंट पाहण्याचा चांगल्या व्ह्यूईंग कपॅसिटीसह येतो.
Motorola Edge X30 मधील प्रोसेसर आणि रॅम बद्दल बोलायचे झाले तर हा जगातील पहिला फोन आहे ज्यामध्ये Snapdragon 8 Gen 1 Octa Core चिपसेट देण्यात आला आहे. याशिवाय, यात 12 GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256 GB UFS 3.1 स्टोरेज स्पेस मिळते. तसेच, यूजर्सना यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी मिळेल, जी 68W फास्ट चार्जरसह येते.
Motorola Edge X30 च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा आहे. सेकेंडरी कॅमेरा देखील 50 मेगापिक्सेलचा देण्यात आला आहे, जी एक अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. यातील तिसरा कॅमेरा 2 मेगापिक्सल्सचा आहे. कंपनीने यात 60 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे.
इतर बातम्या
Smartphones : रंग बदलणारा मोबाइल पाहिलाय? वाचा, कधी येणार आणि काय फिचर्स आहेत
Simless Phone : Appleचा नवा iPhone विशेष तंत्रज्ञानानं सज्ज! सिमकार्डशिवाय मोबाइलवर बोलता येणार..!
(Moto Edge X30 is ready to launch in India with snapdragon 8gen 1 soc and 60MP Selfie camera)