मुंबई : भारत आणि जागतिक बाजारपेठेत नव्या स्मार्टफोनची सिरीज लाँच केल्यानंतर, मोटोरोला कंपनी लवकरच दुसरा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. अशी अपेक्षा आहे की, कंपनी नोव्हेंबरमध्ये मोटो जी 51 सादर करेल. मोटो G51 चे खास फीचर्स एका वेबसाइटवर लीक झाले आहेत. या स्मार्टफोनला “सायप्रस 5 जी” असे कोडनेम देण्यात आले आहे आणि त्यात 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. (Moto G51 smartphone will launch in india in November, features leaked)
Technik News ने Moto G51 चे मुख्य स्पेसिफिकेशन्स लीक केले आहेत. आगामी स्मार्टफोनचा मॉडेल क्रमांक XT2171-1 आहे आणि त्याचे कोडनेम सायप्रस जी आहे. स्मार्टफोन गीकबेंचवर देखील पाहायला मिळाला आहे. ऑगस्टच्या अखेरीस जागतिक स्तरावर लॉन्च झालेल्या Moto G50 5G मध्ये हा फोन अपग्रेड होण्याची शक्यता आहे. लीक्स सुचवतात की मोटोरोला क्वॉलकॉम प्रोसेसर वर स्विच करू शकते.
Motorola ने Moto G50 5G मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरचा वापर केला होता. Lenovo ची मालकी असलेल्या कंपनीने नुकतेच Moto G40 आणि Moto G20 लाँच केले होते.
इतर बातम्या
स्ट्राँग बॅटरी, रिव्हर्स चार्जिंगसह Vivo Y3s (2021) भारतात लाँच, किंमत 9499 रुपयांहून कमी
दमदार प्रोसेसर, फास्ट चार्जरसह Realme चे दोन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स
Samsung ची विक्री जैसे थे, तरीही ठरला जगातील अव्वल स्मार्टफोन ब्रँड, Apple, Xiaomi ला पछाडलं
(Moto G51 smartphone will launch in india in November, features leaked)