मुंबई : मोटोरोलाने भारतात बहुप्रतिक्षित मोटो टॅब जी 20 (Moto Tab G20) लाँच केला आहे. लेनोवोच्या मालकीच्या कंपनीने मोटो टॅब G20 सह टॅबलेट मार्केटमध्ये पुनरागमन केले आहे. फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेलच्या अगोदर हा टॅबलेट लाँच करण्यात आला आहे. 8-इंच डिस्प्ले, मीडियाटेक हेलियो P22T प्रोसेसर आणि 5100 एमएएच बॅटरी यांसारख्या स्पेक्ससह टॅब लाँच करण्यात आला आहे. (Moto Tab G20 Tablet With 8-inch HD Display Launched in India, know price and features)
जेव्हापासून आपण वर्क फ्रॉम होम युगात राहण्यास सुरुवात केली, तेव्हापासून टॅबलेट हे एक अत्यावश्यक साधन बनले आहे. कोविड साथीच्या आजारामुळे लोकांना घरून काम करणे आणि घरातून अभ्यास करणे भाग पडले आहे. अशा परिस्थितीत, व्हिडीओ मीटिंग होस्ट करण्यासाठी किंवा ऑनलाईन क्लासेसमध्ये भाग घेण्यासाठी एक डेडिकेटेड डिव्हाइस असणे महत्वाचे झाले आहे.
पण भारतातील टॅबलेट बाजारात निवडण्यासाठी जास्त पर्याय नाहीत. Apple आणि सॅमसंग टॅब्लेट बाजारात उपलब्ध आहेत, परंतु प्रत्येकजण ते घेऊ शकत नाही. लेनोव्हो हा असा ब्रँड आहे ज्याच्या बजेट रेंजमधील टॅबलेट्सवर ग्राहक विश्वास ठेवू शकतात. तथापि, मोटो टॅब जी 20 सह, बजेट खरेदीदारांना इतर कोणताही पर्याय शोधावा लागणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.
Moto Tab G20 टॅब्लेट 10,999 रुपयांच्या किफायतशीर किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर 2 ऑक्टोबरपासून टॅब्लेटची विक्री सुरू होईल. हा टॅब सिंगल ग्रे कलर व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे.
Motorola Moto Tab G20 TDDI तंत्रज्ञानासह 8 इंचांच्या IPS LCD डिस्प्लेसह येतो. टॅबलेट MediaTek Hello P22T चिपसेटवर काम करतो. जो 3GB रॅम आणि 32GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. Moto Tab G20 आउट ऑफ द बॉक्स Android 11 वर चालतो.
कॅमेरा विभागात, मोटो टॅब जी 20 मागील बाजूस सिंगल कॅमेरा लेन्ससह येतो, ज्यात 5-मेगापिक्सेलचा सेन्सर समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 2 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. मोटो टॅब जी 20 डॉल्बी एटमॉस सपोर्टसह येतो, जे डिव्हाइसची ध्वनी गुणवत्ता वाढवते. टॅब्लेटमध्ये 5100mAh ची बॅटरी आहे आणि त्यात USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे.
इतर बातम्या
Samsung फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी S22 लाँचिंगसाठी सज्ज, आयफोनपेक्षा लहान, फीचर्स दमदार
256 GB स्टोरेज, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह Realme चा शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या फीचर्स
(Moto Tab G20 Tablet With 8-inch HD Display Launched in India, know price and features)