मुंबई : Motorola ने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Moto E30 लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन Moto E40 सारखाच आहे, जो भारतासह अनेक देशांमध्ये लॉन्च झाला आहे. Moto E30 मध्ये अनेक चांगले स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. यामध्ये गुगलच्या अँड्रॉइड गो प्लॅटफॉर्मसह अनेक दमदार फीचर्स मिळतील. (Motorola budget smartphone Moto E30 launched, check price, features)
Moto E30 स्मार्टफोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. तसेच यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या मोबाईलचे वजन 198 ग्रॅम आहे. तसेच हा एक ड्युअल सिम फोन आहे.
Moto E30 मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, जो Max Vision IPS डिस्प्ले आहे. त्याचा आस्पेक्ट रेशो 20:9 आहे. याचे रिझोल्यूशन 720×1,600 पिक्सेल आहे. त्याचा रीफ्रेश रेट 90hz आहे. या डिव्हाइसमध्ये Octa core Unisoc T700 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो 2 GB रॅम आणि 32 GB इंटर्नल स्टोरेजसह उपलब्ध आहे. यामध्ये युजर्स गरज पडल्यास 1 टीबी पर्यंतचं मायक्रो एसडी कार्ड इन्सर्ट करु शकतात.
Moto E30 च्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे, ज्यामध्ये f/1.79 ची लेन्स देण्यात आली आहे. इतर लेन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर दिला गेला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, यात 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे, जो f/2.0 लेन्ससह येतो.
कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाले तर यात 4G LTE आहे. तसेच यात ब्लूटूथ v5, USB टाइप C आणि 3.5mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने यात रियर फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे, जो बायोमेट्रिक पद्धतीने स्मार्टफोन अनलॉक करण्याचे काम करतो. यात 5000mAh बॅटरी आहे, ज्याला 10W फास्ट चार्जर देण्यात आला आहे.
Moto E30 ची किंमत COP 529,900 (जवळपास 10,200 रुपये) आहे, ज्यामध्ये 2 GB रॅम आणि 32 GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन दक्षिण अमेरिकेत विक्रीसाठी उपलब्ध असेल. मात्र, हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत कधी लॉन्च होणार आहे, याची अद्याप कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही.
इतर बातम्या
सार्वजनिक वायफाय वापरताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; तुमचे खाते होऊ शकते हॅक
नेटफ्लिक्स आयफोन यूजर्ससाठी अॅप स्टोअरवर सादर करणार गेमिंग अॅप, जाणून घ्या काय आहे कारण
Kamal Haasan: कमल हसन लाँच करणार एनएफटी कलेक्शन, मेटाव्हर्सच्या विश्वातील पहिले भारतीय सेलिब्रिटी
(Motorola budget smartphone Moto E30 launched, check price, features)