मोटोरोला कंपनी लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन बाजारात लाँच करणार आहे. मोटोरोला एज 60 फ्यूजन असे या स्मार्टफोनचे नाव आहे. यामध्ये कंपनीकडून अनेक मॉडर्न आणि दमदार फीचर्स देण्यात येणार आहेत. सध्या या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा रंगली असून या स्मार्टफोनला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी पाहायला मिळत आहे. या स्मार्टफोनमध्ये हायटेक कॅमेरा देण्यात आला आहे.
मोटोरोला कंपनी ही उच्च दर्जाचे स्मार्टफोन बनवण्यासाठी जगभरात ओळखली जाते. या कंपनीकडून स्मार्टफोनचे अनेक मॉडेल्स बाजारात लाँच करण्यात आले आहेत. लवकरच मोटोरोला एज ६० फ्यूजन हा स्मार्टफोन देखील लाँच केला जाणार आहे. प्रीमियम फीचर्स असलेला हा स्मार्टफोन जगभरात दमदार परफॉर्म करू शकतो. तसेच स्मार्टफोन चाहत्यांसाठी कंपनीकडून हा स्मार्टफोन नव्या तंत्रज्ञानाने लाँच करण्यात येणार आहे.
मोटोरोलाच्या Edge 60 Fusion मध्ये २०० मेगापिक्सलचा रिअर प्रायमरी कॅमेरा देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला या स्मार्टफोनच्या माध्यमातून उत्तम फोटोग्राफी देखील करता येणार आहे. तसेच या रिअर प्रायमरी कॅमेऱ्यातून एचडी फोटो आणि उत्तम क्वालिटीचे व्हिडीओ बनवू शकता. या स्मार्टफोनचा सेल्फी कॅमेरा ५० मेगापिक्सल क्षमतेचा असण्याची शक्यता आहे.
Motorola Edge 60 Fusion या स्मार्टफोनच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन दमदार परफॉर्मन्ससाठी उत्तम बॅटरीने सुसज्ज असणार आहे. ६३०० एमएएच क्षमतेच्या बॅटरीसह हा फोन ग्राहकांना देण्यात येईल. उत्तम बॅटरीने सुसज्ज असलेल्या माध्यमातून हा स्मार्टफोन बराच वेळ वापरता येणार आहे. या स्मार्टफोनसोबत ६८ वॅटचा चार्जरही देण्यात येणार आहे.
या स्मार्टफोनमध्ये युजर्सला १२ जीबी रॅम देण्यात येणार असून, हा स्मार्टफोन २ व्हेरियंटमध्ये उपलब्ध होऊ शकतो. त्यापैकी ग्राहक स्वतःच्या वापरा नुसार २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेज निवडू शकतात. या स्मार्टमध्ये हायटेक प्रोसेसर पाहायला मिळू शकतो.
मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये ६.६८ इंचाचा फुल एचडी प्लस 3डी डिस्प्ले तसेच त्यात एमोलेड डिस्प्ले असू शकतो. ज्याचा रिफ्रेश रेट १४४हर्ट्झ असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रॅम सिस्टिम पाहायला मिळू शकते.
Motorola Edge 60 Fusion हा स्मार्टफोन अद्याप बाजारात उपलब्ध झालेला नाही. मोटोरोला कंपनीने या स्मार्टफोनची अधिकृत माहितीही दिलेली नाही. तरीही हा स्मार्टफोन २०२५ मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि अधिक फीचर्सची माहिती लाँचिंगनंतरच मिळू शकते.