फीचर फोन सेगमेंटमध्ये Motorola ची एंट्री, 3 नवे फोन लाँच करणार, किंमत 1500 रुपयांपासून सुरु

| Updated on: Nov 06, 2021 | 8:11 AM

मोटोरोला भारतीय मोबाइल बाजारात लो बजेट फोन युजर्ससाठी नवीन पर्याय सादर करणार आहे. नवीन माहितीनुसार, Lenovo च्या मालकीची कंपनी लवकरच Moto A10, Moto A50 आणि Moto A70 भारतात लाँच करणार आहे.

फीचर फोन सेगमेंटमध्ये Motorola ची एंट्री, 3 नवे फोन लाँच करणार, किंमत 1500 रुपयांपासून सुरु
Motorola Launching Feature Phones
Follow us on

मुंबई : मोटोरोला भारतीय मोबाइल बाजारात लो बजेट फोन युजर्ससाठी नवीन पर्याय सादर करणार आहे. नवीन माहितीनुसार, Lenovo च्या मालकीची कंपनी लवकरच Moto A10, Moto A50 आणि Moto A70 भारतात लाँच करणार आहे. Gizmochina ने YTechb च्या हवाल्याने या आगामी मोबाईल्सची माहिती दिली आहे. चला तर मग या मोबाईलचे स्पेसिफिकेशन्स आणि इतर वैशिष्ट्ये जाणून घेऊया. (Motorola Launching Three 2G Feature Phones in India, Here’s What They’ll Offer)

भारतीय मोबाइल मार्केटमध्ये फीचर सेगमेंटमध्ये सॅमसंग, नोकिया, लावा आणि मायक्रोमॅक्ससह अनेक ब्रँड उपस्थित आहेत, जे त्यांचे फोन वेगवेगळ्या फीचर्ससह ऑफर करतात.

Moto A10 आणि Moto A50 चे स्पेसिफिकेशन्स

Moto A10 आणि Moto A50 मध्ये 1.8 इंचाचा डिस्प्ले आहे. तसेच MediaTek MT6261D चिपसेट देण्यात आला आहे. दोन्ही मॉडेल हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भारतीय भाषांच्या सपोर्टसह येतात. यात अॅडजस्टेबल फॉन्ट साइज, ऑटो कॉल रेकॉर्डिंग आणि वायरलेस एफएम रेडिओ आहे.

Moto A10 आणि Moto A50 चा कॅमेरा सेटअप

Moto A50 मध्ये बॅक पॅनलवर कॅमेरा आणि टॉर्च लाइट देण्यात आली आहे. हे फीचर Moto A40 मध्ये नाही. दोन्ही डिव्हाईसेस ड्युअल सिम सपोर्टसह येतात आणि यामध्ये तुम्ही मायक्रो एसडी कार्ड इन्सर्ट करु शकता. Moto A10 ची सुरुवातीची किंमत 1500 रुपये असू शकते.

Moto A70 चे स्पेसिफिकेशन्स

Moto A70 मध्ये 2.4 इंचाचा डिस्प्ले मिळेल आणि तो फोन Unisoc चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनच्या बॅक पॅनेलवर VGA कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. हा फोन 100SMS आणि 2 हजार कॉन्टॅक्ट स्टोअर करू शकतो. तसेच, युजर्स कॉन्टॅक्ट आयकॉन म्हणून फोटो ठेवू शकतात. यात एफएम रेकॉर्डिंग फीचर आणि ऑटो कॉल रेकॉर्डिंग फीचर आहे. या मोटोरोला फोनमध्ये 1750mAh क्षमतेची बॅटरी मिळेल, जी मजबूत बॅटरी बॅकअप देण्यात मदत करेल. हीच बॅटरी Moto A10, Moto A50 मध्ये देखील उपलब्ध असेल.

इतर बातम्या

Twitter:”ट्विटरने लोकांच्या भावनांचा आदर करणे गरजेचं,” दिल्ली उच्च न्यायालयचे आदेश

दिवाळीत अवघ्या 1999 रुपयांत खरेदी करा JIOPHONE NEXT, सोबत सोपे EMI पर्याय

Metaverse म्हणजे काय? Virtual Reality द्वारे जग बदलून Facebook कोणती क्रांती करु पाहतंय?

(Motorola Launching Three 2G Feature Phones in India, Here’s What They’ll Offer)