मुकेश अंबानी यांनी चीनला मोठा धक्का दिला आहे. भारत ही मोबाईलची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या भारतीय बाजारपेठेवर वर्चस्व गाजवणाऱ्या चीनला जिओने धक्का दिला आहे. मोबाईलच्या निर्मितीपासून ते त्याचा वापर आणि डेटापर्यंत भारताने ड्रॅगनला मागे टाकले आहे. आता भारत एक उदयोन्मुख मोबाइल बाजारपेठ आहे. रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओ जगभरातील डेटा वापराच्या बाबतीत चिनी कंपन्यांना मागे टाकत सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास आली आहे.
रिलायन्स जिओच्या जून तिमाहीच्या निकालांनुसार, या तिमाहीत जिओ नेटवर्कवरील डेटाचा वापर ४४ एक्झाबाइट्स म्हणजेच ४४०० कोटी जीबी इतका झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ३३ टक्क्याने अधिक आहे. देशातील कोणत्याही दूरसंचार नेटवर्कवरील डेटाचा सरासरी वापर दररोज 1 GB पेक्षा जास्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. Jio 5G नेटवर्कचा यूजरबेस सुमारे 13 कोटी आहे. सध्या Jio 5G नेटवर्क पूर्णपणे मोफत आहे. याचा अर्थ, Jio 5G डेटा वापरण्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
Tefficiectnt च्या अहवालानुसार, Jio नेटवर्कचा एकूण डेटा वापर 40.9 exabytes होता, तर चायना मोबाइलचा डेटा वापर याच कालावधीत 38 exabytes होता. Jio कडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा 5G यूजरबेस आहे. ज्याचे जवळपास 10 कोटी युजर आहेत. जिओच्या एकूण डेटा वापरामध्ये 5G चा वाटा सुमारे 28 टक्के आहे.
5G ग्राहकांबद्दल बोलायचे झाले तर, चीननंतर जिओकडे सर्वाधिक 5G युजर आहेत. मात्र, सध्या 5G सेवा मोफत आहे. अशा परिस्थितीत, जेव्हा 5G रिचार्ज प्लॅन लॉन्च केले जातील, तेव्हा 5G आणि 4G युजर वेगळे असू शकतात. याचा अर्थ, तुम्ही दोन्हीपैकी एकाचाच रिचार्ज करू शकता. सध्या 5G सेवा मोफत आहे. अशा परिस्थितीत जिओ युजर 4जी सोबत 5जी सेवेचा आनंद घेत आहेत. जिओचे जवळपास ४९ कोटी युजर्स आहेत. गेल्या एका वर्षात सुमारे 4 कोटी नवीन युजर जिओमध्ये सामील झाले आहेत.
रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांच्या मते, जिओ हा स्वस्त इंटरनेटचा कणा आहे. Jio नवीन प्रीपेड योजना, 5G आणि AI क्षेत्रांना प्रोत्साहन देईल. कंपनीने चांगल्या नेटवर्क कव्हरेजवर भर दिला होता. तसेच जिओला मार्केट लीडर बनवण्याच्या दिशेने काम करण्यावर भर दिला.