Jio IPL Offer: तमाम क्रिकेट प्रेमींचे लक्ष आता आयपीएलकडे लागले आहे. 22 मार्चापासून आयपीएल सुरु होणार आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने आयपीएल सुरु होण्यापूर्वी क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. जिओने आपल्या सध्याच्या आणि नवीन ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर आणली आहे. रिलायन्स जिओने त्यांचे ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर आयपीएल क्रिकेटचा मोफत आनंद घेण्याची घोषणा केली आहे.
जिओने सध्याच्या ग्राहकांसाठी आणि नवीन ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर आणली आहे. नवीन जिओ सिम कनेक्शन घेतल्यावर आणि 299 रुपयांचा रिचार्ज केल्यावर जिओ यूजर्सला कंपनी त्यांचे ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ हॉटस्टारवर मोफत आयपीएल क्रिकेटचा आनंद घेणार आहे.
जिओच्या अनलिमिटेड क्रिकेट ऑफर योजनेत यूजर्सला टीव्ही आणि मोबाइलवर 90 दिवसांसाठी मोफत जिओ हॉटस्टारचे सब्स्क्रिप्शन मिळणार आहे. तसेच 4K क्वालिटीच्या स्ट्रीमिंगचा आनंद घेता येणार आहे. यामुळे जिओचे यूजर मोबाइल, लॅपटॉप आणि स्मार्ट टीव्हीवर मोफत आयपीएल पाहू शकतात. जिओने या ऑफरला जिओ हॉटस्टार पॅक नाव दिले आहे. ही योजना 22 मार्च 2025 म्हणजे आयपीएल सुरु होण्यापासून 90 दिवसांसाठी आहे. तसेच 2जीबी डे प्लॅनवर यूजर्सला अनलमिटेड 5G डेटा मिळणार आहे.
रिलायन्सने जिओ ब्रॉडबँडवर नवीन ग्राहकांसाठीही ऑफर्स आणली आहे. कंपनी जिओ फायबर किंवा जिओ एअर फायबरची मोफत कनेक्शन देत आहे. जिओच्या अल्ट्रा-फास्ट इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन 50 दिवसांसाठी मोफत असणार आहे. यामध्ये 4K मध्ये क्रिकेट पाहण्याचा अनुभव मिळणार आहे. तसेच घरगुती मनोरंजनाचाही लाभ मिळणार आहे. यामध्ये कनेक्शनसह 800+ टीव्ही चॅनेल, 11+ OTT ॲप्स, अमर्यादित WIFI देखील मिळणार आहे.
जिओची ही ऑफर 17 मार्च ते 31 मार्च 2025 दरम्यान रिचार्ज करणाऱ्यांसाठी आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी जिओ यूजर्सला 299 रुपये किंवा त्यापेक्षा अधिकचे रिचार्ज करावे लागणार आहे. ज्यांनी 17 मार्च पूर्वी रिचार्ज केले आहे, त्यांना 100 रुपयांचा एड-ऑन पॅक घेऊन जिओ हॉटस्टारच्या योजनेचा फायदा घेता येणार आहे.