कधीकाळी मोबाईलला आउटगोइंग कॉल करण्यासाठी नव्हे तर आलेले कॉल (इनकमिंग कॉल) पैसे लागत होते. परंतु रिलायन्स समुहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी मोबाईल क्षेत्रात क्रांती घडवून आणली. इनकमिंग कॉल मोफत झाले, त्यानंतर अनलिमिटेड आउटगोइंग कॉलचे प्लॅन आणले. त्यामुळे मोबाईल प्रत्येकाच्या हातात आला. आता मुकेश अंबानी यांनी आणखी एका गॅझेटमध्ये क्रांती घडवण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहे. जिओचा लॅपटॉपची किंमत कमी झाली असून १२ हजारात लॅपटॉप मिळत आहे. हा लॅपटॉप Amazon.in किंवा Reliance Digital मधून घेता येतो. JioBook 11 लॅपटॉप कार्यालयीन कामांसाठी वापरता येईल. तसेच विद्यार्थ्यांसाठी हे सर्वात चांगले लॅपटॉप ठरणार आहे. विशेष म्हणजे हे Android 4G लॅपटॉप आहे.
कमी किंमतीत जिओचा लॅपटॉप चांगला पर्याय आहे. JioBook लॅपटॉप 12,890 रुपयांमध्ये मिळत आहे. हा लॅपटॉप 2023 मध्ये लॉन्च केला होता. आता JioBook ची किंमत कमी करण्यात आली आहे. लॉन्च केला तेव्हा हा लॅपटॉप 16,499 रुपयांना मिळत होता. परंतु आता त्याची किंमक 12,890 रुपये केली आहे.
Jio ने च्या लॅपटॉमध्ये MediaTek 8788 CPU आहे. तो JioOS वर चालतो. त्यामुळे तो 4G मोबाइल नेटवर्कला कनेक्ट करता येतो. तसेच वायफाय नेटवर्क त्यामुळे मिळणार आहे. या लॅपटॉपची स्क्रीन 11.6 इंच आहे. त्याचे वजन 990 ग्रॅम आहे. हा एकाच रंगात उपलब्ध आहे. यामध्ये 64GB स्टोअरेज आहे. RAM 4GB आहे. Jio चा दावा आहे की, लॅपटॉपची बॅटरी लाईफ 8 तास आहे.
जिओकडून 12 महिन्यांची वॉरंटी दिली जात आहे. लॅपटॉपमध्ये इनफिनिटी की बोर्ड आणि मोठा टचपॅड दिला जात आहे. त्यामुळे काम करणे अधिक चांगले होते. या लॅपटॉपमधून अशा लोकांना टारगेट केले आहे, जे अभ्यास करु इच्छिता आणि पीपीटी तसेच वर्ल्ड डॉकेमेंटमध्ये काम करु इच्छिता. हा लॅपटॉप तुम्ही 12,890 रुपयांमध्ये घेऊ शकतात. वेबकॅम आणि स्टीरियो स्पीकरमुळे व्हिडिओ कॉलिंग करता येते. या लॅपटॉपसाठी 100GB क्लाउड स्टोरेज आहे.