नवी मुंबई : व्हॉट्सअॅपला वारंवार आपल्याला काही नोटिफिकेशन्स (WhatsApp Notification) येत असतात. जर तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरत असाल आणि ते अपडेट करण्यासाठी काही नोटिफिकेशन तुम्हाला मिळाले असेल तर सावध व्हा. कारण ते नोटिफिकेशन बनावट असू शकते आणि त्याद्वारे दुसऱ्याच कंपनीचे बनावट अॅप डाऊनलोड होऊ शकते. इतकंच नाही तर यातून फसवणूकही होऊ शकते. व्हॉट्सअॅपचे सीईओ विल कॅथकार्ट हुबेहूब यांनी ट्विटरवर यासंदर्भात इशारा दिला आहे. आमच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन देण्यात येत नाहीये. त्यामुळे कोणतंही नवीन व्हर्जन सध्या व्हॉट्सअॅप युझर्सने वापरू नये. अन्यथा त्यांना मोठा फटका बसू शकतो, असं विल कॅथकार्ट यांनी म्हटलं आहे. शिवाय सतर्क राहा. असे काही नोटिफिकेशन आल्यास तात्काळ तक्रार करा, असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे वेळीच सावध (Be Careful) व्हा…
व्हॉट्सअॅपला वारंवार आपल्याला काही नोटि फिकेशन्स येत असतात. जर तुम्हीही व्हॉट्सअॅप वापरत असाल आणि ते अपडेट करण्यासाठी काही नोटिफिकेशन तुम्हाला मिळाले असेल तर सावध व्हा. कारण ते नोटिफिकेशन बनावट असू शकते आणि त्याद्वारे दुसऱ्याच कंपनीचे बनावट अॅप डाऊनलोड होऊ शकते. इतकंच नाही तर यातून फसवणूकही होऊ शकते.
व्हॉट्सअॅपचे सीईओ विल कॅथकार्ट हुबेहूब यांनी ट्विटरवर यासंदर्भात इशारा दिला आहे. आमच्याकडून कोणतंही नोटिफिकेशन देण्यात येत नाहीये. त्यामुळे कोणतंही नवीन व्हर्जन सध्या व्हॉट्सअॅप युझर्सने वापरू नये. अन्यथा त्यांना मोठा फटका बसू शकतो, असं विल कॅथकार्ट यांनी म्हटलं आहे. शिवाय सतर्क राहा. असे काही नोटिफिकेशन आल्यास तात्काळ तक्रार करा, असंही त्यांनी म्हटलंय.
जगभरात व्हॉट्सअॅपचे अब्जावधी वापरकर्ते आहेत. त्यांची फसवणूक करण्यासाठी काही टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. ते काही नोटिफिकेशन पाठवतात आणि दुसरं अॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेतात. व्हॉट्सअॅपचे हे फेक अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध नाही. पण काही मेसेज पाठवून नोटिफिकेशन पाठवून अपडेट्सची लिंक तुम्हाला दिली जाते. त्याद्वारे सहज फसवणूक केली जातेय.
आपले व्हॉट्सअॅप अॅप अपडेट करायचे असेल तर केवळ व्हॉट्सअॅपची अधिकृत वेबसाइट किंवा प्ले स्टोअरवरुनच ते करावे. इतर कोणत्याही वेबसाइटचा यासाठी आधार घेऊ नये. अश्या नोटिफिकेशनपासून सावध राहावं.