OTT Platform | नेटफ्लिक्सचा नवीन प्लॅन ? परवडणाऱ्या दरात मिळणार सबस्क्रिप्शन

| Updated on: Apr 20, 2022 | 4:26 PM

नेटफ्लिक्स लवकरच अत्यंत कमी किमतीत सबस्क्रिप्शन देण्याच्या विचारात आहे. मात्र, यात तुम्हाला जाहिरातीही पहाव्या लागणार असल्याचा अंदाज आहे. कंपनी अशा नवीन प्लॅनची चाचपणी करत असून ते लवकरच लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. जाणून घ्या याबाबत अधिक माहिती...

OTT Platform | नेटफ्लिक्सचा नवीन प्लॅन ? परवडणाऱ्या दरात मिळणार सबस्क्रिप्शन
Follow us on

बर्‍याच लोकांना नेटफ्लिक्सचे (Netflixs) सबस्क्रिप्शन (subscription) घ्यायचे आहे, परंतु याचे प्लॅन बरेच महाग असल्याने सर्वांनाच त्याचे सबस्क्रिप्शन घेणे परवडत नसते. त्यामुळे अनेक युजर्स ऐकमेकांना प्लॅन्स शेअर करीत असतात. परंतु आता कंपनी लवकरच ही सुविधा बंद करण्याच्या तयारी असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतात नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन 149 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीपासून सुरु होत असले तरी, कंपनी नवीन योजना बनवत आहे. त्यामुळे नव्या योजनेत नेमके कितीला सबस्क्रिप्शन मिळेल, सध्याच्या प्लॅनपेक्षा याची किमत अजून किती कमी होईल, फिचर्समध्ये (Features) काय नवीन सुविधा असतील? याबाबत युजर्सकडून अनेक तर्क लावण्यात येत आहेत. नेटफ्लिक्स लवकरच आपल्या युजर्सना परवडणारे सबस्क्रिप्शन प्लॅन भेट देण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे सीईओ रीड हेस्टिंग्स यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले, की व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नवीन ऐड-सपोर्ट प्लॅनवर काम करत आहे, हे नवीन प्लॅन कंपनीच्या सध्याच्या प्लॅनपेक्षा कमी किमतीत असतील असेही सुतोवाच त्यांनी केले आहे. आतापर्यंत, नेटफ्लिक्स आपल्या प्लॅटफॉर्मवर जाहिराती दाखवत नव्हता, परंतु युजर्सना स्वस्त प्लॅन देण्यासाठी कंपनी त्यावर काम करत असून कदाचित या नवीन प्लॅनवर युजर्सना जाहिरातीही पहाव्या लागू शकतात.

काय आहे योजना ?

रीड हेस्टिंग्स यांनी सांगितले, की जे नेटफ्लिक्सच्या वापरकर्त्यांना माहिती आहे, कंपनी जाहिरातींच्या गुंतागूंतीपासून नेहमीच लांब राहिली आहे. शिवाय सबस्क्रिप्शनच्या सरळ व सोप्या पध्दतीचा नेहमीच पुरस्कार केला आहे. त्यामुळे
याचा स्पष्ट अर्थ असा आहे, की कंपनी आगामी काळात परवडणारे प्लॅन लॉन्च करू शकते. या प्लॅनमध्ये सदस्यांना जाहिराती देखील पाहायला मिळतील. डिस्ने प्लस हॉटस्टार देखील अशा योजना ऑफर करुन सध्या कंपनी भारतात परवडणाऱ्या किमतीत सबस्क्रिप्शन देत आहे.

प्लॅनची ​​किंमत किती आहे?

नेटफ्लिक्सचा मोबाईल प्लॅन भारतात 149 रुपयांपासून सुरू आहे. पूर्वी हा प्लॅन 199 रुपयांना मिळत होता. कंपनीने अलीकडेच त्याची किंमत कमी केली आहे. दरम्यान, या प्लॅनसह युजर्स फोन किंवा टॅबलेटवर केवळ 480P रिझोल्यूशनसह व्हिडिओ पाहू शकतात. कंपनीचा बेसिक प्लॅन 199 मध्ये उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये तुम्ही कोणत्याही एका मोबाईल, टॅबलेट, कॉम्प्युटर किंवा टीव्ही स्क्रीन प्लॅटफॉर्मचा वापर करु शकता. तर नेटफ्लिक्सच्या स्टँडर्ड प्लॅनची किंमत 499 रुपये आहे. या प्लॅनमध्ये, युजर्स एकाच वेळी दोन वेगळ्या माध्यमातून व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करु शकतात. कंपनीचा स्टँडर्ड प्लॅन 649 रुपये किंमतीचा होता. प्रीमियम प्लॅन 649 मध्ये येतो याची किंमत आधी 799 इतकी होती. या प्लानमध्ये यूजर्स 4K + HDR रिझोल्युशनवर व्हिडिओ पाहू शकतात.

इतर बातम्या-

Aurangabad Fire | इलेक्ट्रिक पोलला धडकली अन् कारनं पेट घेतला, औरंगाबादेत गणोरीजवळ भीषण घटना

Summer Season: वाढत्या उन्हामध्ये कृषी संशोधन संस्थेचा शेतकऱ्यांना काय सल्ला? उत्पादनवाढीची पूर्वतयारी