Whatsapp ने युझर्सच्या सोयीसाठी अनेक फीचर्स आणले आहेत. त्यात अजून एका नवीन फीचरची भर पडणार आहे. आतापर्यंत ज्या युझरचा मोबाईल क्रमांक सेव्ह होता, त्यांनाच कॉल करता येत होता. पण त्यात व्हॉट्सॲप बदल करत आहे. ज्या युझरचा मोबाईल क्रमांक सेव्ह नाही, जतन नाही. डायल-यादीत त्यांचे नाव नाही, त्यांना पण आता व्हॉट्सॲप कॉल करता येणार आहे. तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला डायलर पॅडवर नंबर डायल करुन जसा कॉल करता, तसेच हे फीचर व्हॉट्सॲपवर काम करेल. त्यासाठी नंबर सेव्ह करण्याची गरज नसेल.
डायलरचा होणार उपयोग
व्हॉट्सॲपचे हे नवीन फीचर विकसीत होत आहे. हे फीचर युझरला त्यांच्या व्हॉट्सॲप डायलरच्या माध्यमातून व्हाईस कॉलची सुविधा देणार आहे. हे नवीन फीचर अजून पर्यंत Google Play बीटा प्रोगामवर वापरकर्त्यांसाठी अजून देण्यात आलेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, हे फीचर त्या युझर्सला एकदम उपयोगी पडेल, ज्यांच्याकडे समोरील व्यक्तीचा क्रमांक सेव्ह नसेल. त्याला केवळ डायलरवरुन संबंधिताचा मोबाईल क्रमांक डायल करुन व्हॉट्सॲप कॉल करता येईल.
फीचर लवकरच होईल अपडेट
सूत्रांच्या माहितीनुसार, नवीन डायलर फीचर WABetainfo कडून अँड्राईडसाठी व्हॉट्सॲप बीटा आवृत्ती 2.24.9.28 वर शोधता आले आहे. सध्या या फीचरवर काम सुरु आहे. ते अपडेट करण्याचे काम सुरु आहे. हे फीचर आल्यावर व्हॉट्सॲप केवळ एक मॅसेजिंग प्लॅटफॉर्म राहणार नाही. तर एक मल्टि फंक्शनल कॉलिंग सेवा देणारे ॲप ठरणार आहे.
उद्देश तरी काय?
डायलर पॅडचा समावेश करण्यामागे कंपनीचा उद्देश तरी काय, असा प्रश्न तज्ज्ञांना पडला आहे. कंपनीने याविषयीचे कारण अजून स्पष्ट केलेले नाही. पण अनोळखी व्यक्तींना गरजेच्या वेळी कॉल करता यावा, यासाठी हे फीचर आणण्यात आले आहे. त्यामुळे ऑफिशिअल अथवा अभ्यासाविषयी, अभ्यासक्रमाविषयीची मीटिंग घेता येईल. वस्तूंच्या डिलिव्हरीसाठी कॉल करता येईल. एखाद्या अपाईंटमेंटसाठी त्याचा वापर करता येईल. गेल्या वर्षी व्हॉट्सॲपने एक फीचर आणले होते, त्यामुळे युझर्सला काँन्टक्ट सेव्ह न करता चॅटिंग करणे सोपे झाले होते.