डिजिटल व्यवहार, ते ही विना इंटरनेट, कसं शक्य आहे? त्यासाठी वाचा ही महत्त्वाची माहिती

| Updated on: Jan 07, 2022 | 4:51 PM

पेटीएमने ग्राहकांसाठी ‘Tap to Pay’ सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे मोबाईलमध्ये इंटरनेट नसेल तरी डिजिटल व्यवहार पूर्ण करता येणार आहेत. POS मशीनवर फोन टॅप करताच व्यवहार पूर्ण होईल.विशेष म्हणजे फोन लॉक झाला तरी या सुविधेने पेमेंट मिळू शकते.

डिजिटल व्यवहार, ते ही विना इंटरनेट, कसं शक्य आहे? त्यासाठी वाचा ही महत्त्वाची माहिती
ऑनलाइन पेमेंट प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

डिजिटल युगात विना इंटरनेट वापर करता डिजिटल व्यवहार पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता या डिजिटल क्रांतीत Paytm ही उतरले आहे. रिझर्व्ह बँकेने फिचर फोनधारकांना एकूण 2 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार पूर्ण करण्याची मुभा दिली आहे. तर दुसरीकडे Paytm ने त्यांच्या स्मार्ट फोन ग्राहकांना 5000 रुपयांपर्यंतचे व्यवहाराची हमी दिली आहे.

Paytm Tap to Pay:

पेटीएमने ग्राहकांसाठी ‘Tap to Pay’ सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे मोबाईलमध्ये इंटरनेट नसेल तरी डिजिटल व्यवहार पूर्ण करता येणार आहेत. POS मशीनवर फोन टॅप करताच व्यवहार पूर्ण होईल.विशेष म्हणजे फोन लॉक झाला तरी या सुविधेने पेमेंट मिळू शकते. टॅप टू पे(Paytm Tap to Pay) या सुविधेचा सध्या अँड्रॉइड(Android) आणि iOS या मोबाईलधारकांना लाभ घेता येईल.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुमच्या फोनमधील नियर फिल्ड कमुनिकेशन  NFC या पर्यायाला सुरू करावे लागेल त्यानंतर POS मशीन वर फोनला टेप करून तुमचे ठरलेले पेमेंट पूर्ण होईल हा संपूर्ण व्यवहार सुरक्षित असून तुमची खाजगी माहिती यामुळे कुठेही उघडकीस येत नाही  तुमच्या खात यासंबंधीची माहितीही उघड होत नाही

कार्ड ची माहिती होणार डिजिटल प्रायमरी अकाउंट क्रमांकात रूपांतरित

पेटीएम च्या ॲक्टिव्ह (Active)खात्यांमधील यादीत जितक्या कार्डची(Cards) माहिती जमा असेल सेव असेल त्यातील कोणत्याही कार्डची निवड करता येईल आणि त्या आधारे व्यवहार पूर्ण करता येतील पेटीएम त्यांच्या तंत्रज्ञानाद्वारे स्वतःहून 16 आकडी कार्डची माहिती प्रायमरी अकाउंट क्रमांकात (PAN) रूपांतरित करेल. या (PAN)कार्ड द्वारेच पुढील सर्व व्यवहार पूर्ण करता येतील डिजिटल व्यवहार पूर्ण करताना पेटीएम वापरकर्त्याचे कुठलीही माहिती प्रसारित अथवा शेअर करत नाही.

कोणत्याही POS मशीन द्वारे व्यवहार होईल. 

POS मशीन द्वारे कोणत्याही दुकानांत, आउटलेटमध्ये सुरक्षितपणे व्यवहार पूर्ण करता येईल. परंतु त्यासाठी मोबाईल मधील NFC सुरू ठेवावे लागेल. तरच POS मशीन वा कार्ड मशीन उपयोगात आणता येईल.

हा व्यवहार पूर्णपणे डिजिटल असला तरी व्यवहाराचे हे माध्यम एकदम सुरक्षित आहे. या व्यवहारादरम्यान वापरकर्त्याची कोणती ही माहिती शेअर करण्यात येत नाही. ग्राहकांची खातेसंदर्भातील संपूर्ण माहिती सुरक्षित क्लाउड सर्व्हर मध्ये जमा करून ठेवण्यात येते. विशेष म्हणजे हे सर्व्हर  सुरक्षित आणि वेगवान सेवा पुरविते.

5000 रुपयांपर्यंत विना पिन व्यवहार 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया च्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार कोणताही ग्राहक टॅप सेवेच्या माध्यमातून कमाल 5000 रुपयांचा डिजिटल व्यवहार पूर्ण करु शकतो.  जर 5000 रुपयांपेक्षा जास्तीचा व्यवहार करयाचा असल्यास ग्राहकांना त्यांच्या पिनचा व्यवहार करताना वापर करावा लागेल. यापूर्वी व्यवहाराची मर्यादा  2000 रुपये होती.