तुम्हाला ब्ल्यूटूथ कॉलिंगची सुविधा (Bluetooth Calling)असलेली, ट्रेंडी स्मार्टवॉच (Smart watch) खरेदी करायची इच्छा असेल तर बाजारात अनेक नवे पर्याय उपलब्ध आहेत. नॉईज (Noise)कंपनीचे नवे स्मार्टवॉच भारतीय बाजारात लाँच झाले आहे. ‘नॉईज कलरफिट अल्ट्रा 2 बझ’ ( Noise ColorFit Ultra 2 Buzz) असे त्याचे नाव आहे. या स्मार्टवॉचमध्ये अनेक विशेष फीचर्स (new features) देण्यात आली आहेत. यामध्ये मोठा एमोलेड डिस्प्ले, ऑलवेज ऑन डिस्प्ले आणि 100 स्पोर्ट्स मोड्सचा सपोर्ट देण्यात आला आहे. तुम्हााही नवे स्मार्टवॉच हवे असेल तर नॉईज कलरफिट अल्ट्रा 2 बझचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स तसेच किंमत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.
Noise ColorFit Ultra 2 Buzz या स्मार्टवॉचची किंमत 3999 ( MRP 6999) रुपये इतकी आहे. 17 ऑगस्ट दुपारी 12 वाजल्यापासून हे स्मार्टवॉच विक्रीसाठी उपलब्ध असेल. जरी याची MRP जास्त असली तरी कंपनीने स्पेशल प्राईस (3999 रुपये) लाँच केली आहे. ग्राहकांना हे स्मार्टवॉच व्हिंटेज ब्राऊन, जेट ब्लॅक, सिल्व्हर ग्रे, व्हिंटेज ग्रे , शॅंपेन ग्रे आणि ऑलिव्ह ग्रीन या रंगांमध्ये मिळू शकेल.
Noise ColorFit Ultra 2 Buzz या स्मार्टवॉचमध्ये 1.78 इंचांची एमोलेड स्क्रीन देण्यात आली असून ती 368 x 448 पिक्सेल रेझोल्युशन देते. तसेच 500 निट्स पीक ब्राइटनेसही या वॉचमध्ये मिळणार आहे. ऑल्वेज ऑन डिस्प्ले (Always on Display) आणि मल्टीपल वॉच फेस असणाऱ्या या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5.3 कनेक्टिव्हिटीसह मिळते. हे स्मार्टवॉच मेटॅलिक फिनिशसह येते. फिटनेस फीचर्सबाबत सांगायचे झाले तर हे स्मार्टवॉच 24/7 हार्ट रेस सेन्सर आणि ब्लड ऑक्सीजन लेव्हल यासारख्या सुविधाही ऑफर करते. त्याशिवाय या स्मार्टवॉचमध्ये 100 हून अधिक वॉच फेस सपोर्ट आणि 100 स्पोर्ट्स मोड्सही आहेत.
या वॉचमध्ये ब्ल्यूटूथ कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे युजर्सना खिशातून फोन न काढताही कॉल रिसीव्ह करता येईल आणि पोटभर गप्पा मारता येतील.
बॅटरीबाबत सांगायचे झाले तर नॉईज ब्रँडच्या या नव्या स्मार्टवॉचमध्ये, 7 दिवसांपर्यंत पुरेल इतकी बॅटरी लाईफ आहे. मात्र ब्ल्यूटूथ कॉलिंग फीचरचा वापर केल्यास बॅटरी 6 दिवसांपर्यंत पुरते. या वॉचद्वारे तुम्ही म्युझिक कंट्रोल आणि कॅमेरा कंट्रोल करू शकाल.