10 हजार रुपयांच्या रेंजमध्ये Nokia चा ढासू स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या शानदार फीचर्स
स्मार्टफोनच्या लोकप्रिय सी-सीरीज पोर्टफोलिओला बळकट करण्यासाठी नोकिया एचएमडी ग्लोबलने गुरुवारी बजेट स्मार्टफोन नोकिया सी 30 (Nokia C30) दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे.
1 / 5
स्मार्टफोनच्या लोकप्रिय सी-सीरीज पोर्टफोलिओला बळकट करण्यासाठी नोकिया एचएमडी ग्लोबलने गुरुवारी बजेट स्मार्टफोन नोकिया सी 30 (Nokia C30) दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर केला आहे.
2 / 5
नोकिया C30 प्रमुख ऑफलाइन रिटेल स्टोअर्स, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि nokia.com वर अनुक्रमे 10,999 आणि 11,999 रुपयांमध्ये 3GB RAM + 32GB स्टोरेज आणि 4GB + 64GB वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. हा फोन ग्रीन आणि व्हाईट या दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे.
3 / 5
एचएमडी ग्लोबलचे उपाध्यक्ष सन्मीत सिंग कोचर म्हणाले की, "नवीन नोकिया सी 30 आमच्या सी-सीरिज रेंजमध्ये सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन आहे. हा फोन परवडणाऱ्या किंमतीसह उत्तम एक्सपीरियन्स देतो. हा फोन लोकांच्या मागण्या पूर्ण करेल.
4 / 5
या स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचांचा HD+ डिस्प्ले आणि 6,000mAh क्षमतेची बॅटरी आहे जी सिंगल चार्जवर तीन दिवस टिकू शकते. यात 13MP ड्युअल कॅमेरा सपोर्ट आहे.
5 / 5
जिओ एक्सक्लुझिव्ह ऑफरचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना बेस्ट प्राईस टॅगवर 10 टक्के किंवा जास्तीत जास्त 1,000 रुपयांचा इमीडिएट व्हॅल्यू सपोर्ट मिळेल. त्यामुळे ग्राहकांना 3 जीबी आणि 4 जीबी व्हर्जनसाठी अनुक्रमे 9,999 आणि 10,999 रुपये मोजावे लागतील.