नवी दिल्ली : पाऊस असो वा उष्मा, हवामान खात्याने किती जरी अचूक अंदाज वर्तवले, तरी प्रत्यक्ष अनुभूती घेईपर्यंत त्यावर भरवसा न ठेवणारे अनेकजण आहेत. आता अशा लोकांपुढे लवकरच एक विश्वसनीय माध्यम म्हणून सुपर कम्प्युटर दाखल होणार आहे. हा कम्प्युटर जगातील सर्वात शक्तिशाली सुपर कम्प्युटर असेल व तो हवामानातील बदलांबाबत अत्यंत अचूक अंदाज वर्तवेल, असा दावा हा कम्प्युटर विकसित करणार्या संशोधकांनी केला आहे. मायक्रोसॉफ्टचा हवामान विभाग आणि युनायटेड किंगडम (युके) यांनी संयुक्तपणे या सुपर कम्प्युटरच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. (Now the super computer will predict the weather forecast)
ब्रिटनच्या हवामान विभागाने एका प्रसिद्धीपत्रकातून या सुपर कम्प्युटरची खूशखबर दिली आहे. हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे की, हा सुपर कम्प्युटर सन 2022 पर्यंत कार्यरत होईल. हा सुपर कम्प्युटर बदलत्या आणि तीव्र हवामान परिस्थितीबद्दल अचूक अंदाज वर्तवेल. त्याचबरोबर वादळ, पूर आणि बर्फवृष्टीमुळे होणारी परिणामांपासून जिवीतहानी टाळण्यास मदत करेल.
ब्रिटनच्या हवामान खात्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पेन्ने अँडरस्बी यांनी याबाबत सांगितले की, सुपर कम्प्युटरच्या निर्मितीसाठी मायकोसॉफ्ट आणि आम्ही एकत्र काम करत आहोत. यासाठी एकत्रितपणे हवामानाचे आतापर्यंतचे अंदाज आणि आकडेवारी संकलित करीत आहोत. त्याच अनुषंगाने सखोल अभ्यास करून सुपर कम्प्युटरच्या आधारे पुढील काळात हवामान बदलाबाबत अचूक भविष्यवाणी केली जाणार आहे. अशा प्रकारची भविष्यवाणी आणि अॅलर्टवरूनच लोकांना सुरक्षित राहून बाहेर न जाण्याचा इशारा देण्यात येईल.
सुपर कम्प्युटरच्या निर्मितीसाठी ब्रिटनचे सरकार तब्बल 12,400 कोटी रुपये खर्च करणार आहे. सरकारने फेब्रुवारी 2020 मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी पुरवणार असल्याची घोषणा केली होती. हा सुपर कम्प्युटर जगभरातील आघाडीच्या 25 शक्तीशाली सुपर कम्प्युटरपैकी एक असेल, असा दावा केला जात आहे.
प्रगत हवामान बदलांच्या मॉडेलिंगसाठीदेखील या कम्प्युटर डिव्हाइसचा वापर केला जाणार आहे. हा सुपर कम्प्युटर हवाई वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या हवा आणि तापमानाच्या परिस्थितीबाबतही अचूक अंदाज वर्तवणार आहे. या सुपर कम्प्युटरच्या मदतीने वादळ, अतिवृष्टी आणि पूर टाळण्यासाठी आपत्कालीन तयारी करण्यास मोठी मदत होईल, असे सांगण्यात येत आहे. हवामानाच्या पूवार्नुमानासाठी प्रथमच सुपर कम्प्युटर वापरला जात आहे, असे नाही. जपानमध्ये आधीपासूनच असा कम्प्युटर आहे. या कम्प्युटरचे नाव ‘फुगाकू’ असून त्सुनामीमुळे येणार्या पुराच्या भविष्यवाणीसाठी या कम्प्युटरचा वापर केला जात आहे. (Now the super computer will predict the weather forecast)
अदार पुनावाला यांच्या जीवाला धोका? गृह मंत्रालयाने पुरवली ‘वाय’ दर्जाची सुरक्षाhttps://t.co/F8K7lvnRkf#AdarPunawala |#homeMinistry |#provide |#security
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 28, 2021
इतर बातम्या
Gold Price Today : सोने-चांदी पुन्हा एकदा स्वस्त, पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याची किंमत