नवी दिल्ली – मुंबईस्थित कर्ज देणाऱ्या CASHe या प्लॅटफॉर्मने व्हॉट्सअप क्रेडिट लाईन (Whatsapp Credit Line) सर्व्हिस सुरु करण्याची घोषणा केली आहे. या योजेनेंतर्गत व्हाट्सअप युझर्स (Whatsapp users)कादपत्रांविना, कुठलाही अर्ज न भरता आणि कोणतेही एप डाऊनलोड न करता तत्काळ कर्ज (instant loan) मिळवू शकणार आहेत. या सेवेचा उपयोग करण्यासाठी कैशे केच्या अधिकृत व्हॉट्सअप नंबरवर हाय असे टाईप करुन पाठवायचे आहे. अशा प्रकाराची कोणत्याही कागदपत्राविना कर्ज देणारी पहिली फिनटेक अंटरप्रायजेझ असल्याचा दावा या कंपनीने केला आहे.
एआय-पॉवर्ड बॉटच्या सहाय्याने कंपनी ही सेवा कार्यरत करते आहे.
या फिचरमुळे एआय-पॉवर्ड मोडमधून केवायसी चेक आणि व्हेरिफिकेशनची प्रोसेस पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर तुमची कर्जसीमा ठरवण्यात येईल. म्हणजे तुम्हाला किती कर्ज मिळू शकेल, याची माहिती देण्यात येईल. तुमच्याकडून देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर हा आकडा निश्चित करण्यात येईल. केवळ पगारी नोकरदारांसाठीच ही सुविधा असणार आहे.
कॅश केचे संस्थापक अध्यक्ष वी रमन कुमार यांनी सांगितले आहे की, या सेवेत कस्टमर फर्स्ट हा आमचा हेतू आहे. सध्याच्या स्मार्ट ग्राहकांना लगेच आणि संपर्काविना सपोर्ट हवा असतो. आम्ही व्हॉट्सअपवर त्याच दिशेने प्रयत्न करीत आहोत. इंटस्ट्री फर्स्ट आणि नवकल्पनेची सर्व्हिस आमचा ग्राहकांना अधिक सशक्त करेल.