मुबई : वनप्लसने (OnePlus) आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन OnePlus 10 Pro स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च केला आहे आणि आता कंपनी हा मोबाइल भारतात लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. खरं तर, भारतात लॉन्च संदर्भात एक नवीन खुलासा समोर आला आहे, ज्यामध्ये असे कळले आहे की, वनप्लस 10 प्रो (OnePlus 10 Pro) ची विक्री भारतात वसंत ऋतू म्हणजेच फेब्रुवारी किंवा मार्चच्या शेवटी सुरु केली जाईल. खुद्द कंपनीनेच ही माहिती दिली आहे. यावेळी कंपनीने आपल्या डिव्हाइसच्या डिझाईनमध्येही काही बदल केले आहेत. जुन्या रिपोर्ट्सनुसार, हा मोबाइल फोन (Mobile Phone) या मार्चच्या अखेरीस जागतिक आणि भारतीय बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो. सध्या या फोनच्या टेस्टिंगचं काम सुरु आहे.
या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6.7 इंचाचा LTPO 2.0 AMOLED डिस्प्ले आहे, जो व्हेरिएबल रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो, म्हणजेच तो 1Hz ते 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याचे रिझोल्यूशन 3216 x 1440 पिक्सेल आहे. यामध्ये 1300 nits चा ब्राइटनेस मिळेल. याचा स्क्रीन टू बॉडी रेशो 92.7 टक्के इतका आहे. स्क्रीनच्या संरक्षणासाठी गोरिल्ला ग्लास विक्टसचा वापर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन डिस्प्ले फीचर्ससह येतो. यामध्ये क्वालकॉमचा लेटेस्ट फ्लॅगशिप प्रोसेसर वापरण्यात आला आहे, जो स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 आहे. यात LPDDR5 रॅम आहे. तसेच UFS 3.1 अंतर्गत स्टोरेज उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी 80W वायर चार्जिंगला सपोर्ट करते. यात 50W वायरलेस चार्जिंगची सुविधा देखील आहे. हा फोन Android 12 आधारित ColorOS 12 वर काम करेल. हा फोन नुकताच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे, मात्र, हा मोबाईल भारतासह इतर देशांमध्ये कधी लॉन्च केला जाईल याची माहिती अद्याप कंपनीने दिलेली नाही.
OnePlus 10 Pro च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सल्सचा आहे, तर 50 मेगापिक्सल्सची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. यामधील तिसरा कॅमेरा 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तसेच कॅमेरा सॉफ्टवेअरमध्ये नवीन Hasselblad Master Style देण्यात आली आहे.
OnePlus चा हा फोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे, जिथे त्याची किंमत RMB 4699 (जवळपास 54,521 रुपये) आहे, ज्यामध्ये 8/128 GB व्हेरिएंट उपलब्ध आहे. त्याच वेळी, 8/256 GB व्हेरिएंटची किंमत RMB 4999 (जवळपास 57,997 रुपये) आहे, तर 12/255 GB व्हेरिएंट RMB 5299 (जवळपास 61,478 रुपये) मध्ये उपलब्ध असेल. मात्र, भारतात त्याची किंमत काय असेल, याची माहिती देण्यात आलेली नाही.
इतर बातम्या
11000 रुपयांच्या रेंजमध्ये 5 बेस्ट स्मार्टफोन्स, जाणून घ्या कॅमेरा डीटेल्स आणि फीचर्स