चार कॅमेऱ्यांसह OnePlus चा 4K स्मार्ट टीव्ही U1S लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

| Updated on: Jun 11, 2021 | 5:15 PM

वनप्लसने (OnePlus) एक नवीन स्मार्ट टीव्ही रेंज वनप्लस टीव्ही यू 1 एस (OnePlus TV U1S) लाँच केली आहे. ही नवीन 4K स्मार्ट टीव्ही सिरीज तीन आकारात लाँच केली गेली आहे.

चार कॅमेऱ्यांसह OnePlus चा 4K स्मार्ट टीव्ही U1S लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
OnePlus TV U1S
Follow us on

मुंबई : वनप्लसने (OnePlus) एक नवीन स्मार्ट टीव्ही रेंज वनप्लस टीव्ही यू 1 एस (OnePlus TV U1S) लाँच केली आहे. ही नवीन 4K स्मार्ट टीव्ही सिरीज तीन आकारात लाँच केली गेली आहे, ज्यात 50 इंच, 55 इंच आणि 65 इंचांच्या व्हेरिएंटचा समावेश आहे. (OnePlus launches new 4K smart TV OnePlus TV U1S; check Price, features)

वनप्लस टीव्ही U1S ची किंमत 39,999 रुपये आहे. यात तुम्हाला 50 इंचांचं व्हेरिएंट मिळेल. तर 55 इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत 47,999 रुपये इतकी आहे. त्याचबरोबर 65 इंचाच्या टीव्हीची किंमत 62,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. वनप्लस टीव्हीमध्ये व्हॉईस कंट्रोल पर्याय उपलब्ध आहे. व्हॉईस कमांडच्या सहाय्याने युजर्स टीव्ही इंटरफेस नेव्हिगेट करू शकतात. टीव्ही वेयरेबल डिव्हाइसशी कनेक्ट केला जाऊ शकतो. त्याच वेळी, वेयरेबल डिव्हाईसेसद्वारे टीव्ही कंट्रोलदेखील करु शकतो.

4K डिस्प्ले पॅनेलमध्ये Gamma इंजिन ऑप्टिमायझेशन उपलब्ध आहे, ज्याच्या मदतीने आपल्याला सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल्स मिळतात. आपल्याला टीव्हीमध्ये कॅमेर्‍याची सुविधादेखील देण्यात आली आहे, जेणेकरून आपण व्हिडिओ कॉल करू शकता.

वनप्लस टीव्हीमध्ये 30W स्पीकर्स दिले आहेत. Dyna ऑडिओसोबत भागीदारी करत कंपनीने स्पीकर्स बनवले आहेत. आपल्याला टीव्हीमध्ये Dolby एटमॉस सराउंड एक्सपीरियन्स मिळेल. टीव्ही HDR10+ प्रमाणित आहे. युजर्सना टीव्हीमध्ये स्पीक नाऊ फीचरदेखील मिळते, जेणेकरून आपण Google असिस्टन्सचा वापर करू शकता.

आपल्याला टीव्हीमध्ये किंड्स मोडदेखील मिळतो, जेणेकरून आपण आपल्या मुलांसाठी टाइम लिमिट सेट करू शकता. युजर्स टाईम कस्टमाईज करु शकतात आणि त्यांच्या गरजेनुसार डेटा लिमिटदेखील सेट करू शकतात. वनप्लस टीव्ही U1S मध्ये वनप्लस कनेक्ट 2.0 देखील आहे, जो वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाइल फोनवरून टाइप इनपुट करण्यास मदत करतो.

OnePlus चा सर्वात स्वस्त 5G फोन लाँच

दरम्यान, वनप्लस नॉर्ड सीई 5 जी (OnPlus Nord CE 5G) हा कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. हा फोन कंपनीच्या नॉर्ड प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आला आहे म्हणून याच्या नावात Nord चा वापर करण्यात आला आहे. तर CE म्हणजे कोअर एडिशन (Core Edition), म्हणून या फोनला OnPlus Nord CE 5G असं नाव देण्यात आलं आहे. हा फोन तीन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ब्लू वॉयड. चारकोल इंक आणि सिल्व्हर रे या रंगांचा समावेश आहे.

OnePlus Nord CE 5G च्या बॅक पॅनेलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा सेन्सर दिला गेला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला आहे. वनप्लस नॉर्ड CE 5G हा फोन 22,999 रुपये या सुरुवातीच्या किंमतीत सादर करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज पर्याय मिळेल. तर याच्या तर 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी व्हेरियंटची किंमत 24,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. 12 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटसाठी ग्राहकांना 27,999 रुपये मोजावे लागतील.

फीचर्स

बजेट फोन प्रेमींना टार्गेट करण्यासाठी कंपनीने हा मिड-रेंज स्मार्टफोन सादर केला आहे. हा ड्युअल नॅनो सिम सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. या लेटेस्ट OnePlus Mobile मध्ये 6.43 इंचांचा फुल एचडी प्लस (1080×2400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अॅस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज इतका आहे. फोन Android 11 वर आधारित ऑक्सीजन ओएस 11 वर काम करतो. या फोनला पॉवर देण्यासाठी 4500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये वार्प चार्ज 30 टी प्लस टेक्नोलॉजी दिली आहे. ज्याच्या मदतीने हा फोन अवघ्या 30 मिनिटात शून्य ते 70 टक्क्यांपर्यंत चार्ज होतो.

इतर बातम्या

दमदार प्रोसेसर आणि डिस्प्लेसह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Tab S8 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?

(OnePlus launches new 4K smart TV OnePlus TV U1S; check Price, features)