मुंबई : वनप्लस नॉर्ड सीई 5 जी (OnPlus Nord CE 5G) हा कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. हा फोन कंपनीच्या नॉर्ड प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आला आहे म्हणून याच्या नावात Nord चा वापर करण्यात आला आहे. तर CE म्हणजे कोअर एडिशन (Core Edition), म्हणून या फोनला OnPlus Nord CE 5G असं नाव देण्यात आलं आहे. हा फोन तीन रंगांमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये ब्लू वॉयड. चारकोल इंक आणि सिल्व्हर रे या रंगांचा समावेश आहे. (OnePlus Nord CE 5G launched With Snapdragon 750G SoC, 90Hz AMOLED Display, check Price and Specifications)
OnePlus Nord CE 5G च्या बॅक पॅनेलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा सेन्सर दिला गेला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला आहे.
64MP. That’s 16MP more than it’s predecessor
Follow @OnePlus_IN for more real time updates from the #OnePlusSummerLaunch Event | #OnePlusNordCE #OnePlusTVU1S pic.twitter.com/w69zhx0u7s
— OnePlus India (@OnePlus_IN) June 10, 2021
वनप्लस नॉर्ड CE 5G हा फोन 22,999 रुपये या सुरुवातीच्या किंमतीत सादर करण्यात आला आहे. यामध्ये तुम्हाला 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज पर्याय मिळेल. तर याच्या तर 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी व्हेरियंटची किंमत 24,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. 12 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेज व्हेरियंटसाठी ग्राहकांना 27,999 रुपये मोजावे लागतील.
The first to order OnePlus Nord CE get it first. Simple.
Time to flex that Red Cable Club status and become the first to own the latest from OnePlus.
Pre-orders begin tomorrow at 12PM
Learn more – https://t.co/oQgVeK4uFW pic.twitter.com/Q7KL7WW9P9
— OnePlus India (@OnePlus_IN) June 10, 2021
बजेट फोन प्रेमींना टार्गेट करण्यासाठी कंपनीने हा मिड-रेंज स्मार्टफोन सादर केला आहे. हा ड्युअल नॅनो सिम सपोर्टसह सादर करण्यात आला आहे. या लेटेस्ट OnePlus Mobile मध्ये 6.43 इंचांचा फुल एचडी प्लस (1080×2400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अॅस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज इतका आहे. फोन Android 11 वर आधारित ऑक्सीजन ओएस 11 वर काम करतो. या फोनला पॉवर देण्यासाठी 4500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये वार्प चार्ज 30 टी प्लस टेक्नोलॉजी दिली आहे. ज्याच्या मदतीने हा फोन अवघ्या 30 मिनिटात शून्य ते 70 टक्क्यांपर्यंत चार्ज होतो.
प्रोसेसर | Qualcomm Snapdragon 750G |
डिस्प्ले | 6.43 inches (16.33 cm) |
स्टाेरेज | 64 GB |
कॅमेरा | 64 MP + 8 MP + 2 MP |
बॅटरी | 4500 mAh |
बेस व्हेरिएंटची किंमत | 22999 |
रॅम | 6 GB |
Blue Void, Charcoal Ink or Silver Ray? Let us know in the replies below ?
Follow @OnePlus_IN for more real time updates from the #OnePlusSummerLaunch Event | #OnePlusNordCE #OnePlusTVU1S pic.twitter.com/nuRpFdxylN
— OnePlus India (@OnePlus_IN) June 10, 2021
इतर बातम्या
दमदार प्रोसेसर आणि डिस्प्लेसह Realme X7 Max 5G भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
लाँचिंगपूर्वीच Samsung Galaxy Tab S8 ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या काय असेल खास?
(OnePlus Nord CE 5G launched With Snapdragon 750G SoC, 90Hz AMOLED Display, check Price and Specifications)