रिलायन्स डिजिटलवर JioPhone Next चा सेल सुरु, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

| Updated on: Nov 24, 2021 | 9:08 PM

तुम्ही Reliance चा सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओफोन नेक्स्ट आता रिलायन्स डिजिटलच्या वेबसाइटवरून ऑनलाइन देखील खरेदी करता येईल.

रिलायन्स डिजिटलवर JioPhone Next चा सेल सुरु, जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स
JioPhone Next
Follow us on

Reliance JioPhone Next Online Sale : तुम्ही Reliance चा सर्वात स्वस्त 4G स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जिओफोन नेक्स्ट आता रिलायन्स डिजिटलच्या वेबसाइटवरून ऑनलाइन देखील खरेदी करता येईल. हा एंट्री-लेव्हल फोन खरेदी करण्यासाठी आधी ग्राहकांकडे केवळ एकच पर्याय होता. इच्छुक खरेदीदारांना यापुढे डिव्हाइससाठी नोंदणी करण्याची आवश्यकता नाही आणि ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरूनच फोन ऑर्डर शकतात. (Online sale of JioPhone Next started on Reliance Digital website, know price and offers)

JioPhone Next ऑनलाइन स्टोअरवर त्याच किमतीत उपलब्ध आहे, परंतु तुम्ही सवलतीच्या दरात डिव्हाइस मिळवण्यासाठी बँक ऑफरचा लाभ घेऊ शकता. तसेच, फोनची शिपिंग विनामूल्य असेल, यासाठी युजर्सना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

JioPhone Next ची किंमत

JioPhone नेक्स्टची किंमत भारतात 6,499 रुपये आहे. ही किंमत 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज मॉडेलची आहे. अधिकृत रिलायन्स डिजिटल साइटनुसार, येस बँक क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना फोनवर 10 टक्क्यांपर्यंत पर्यंत इन्स्टंट डिस्काऊंट आणि अमेरिकन एक्सप्रेस कार्डवर 7.5 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते.

ज्या ग्राहकांना EMI वर फोन घ्यायचा आहे ते 305.93 रुपये प्रति महिना भरून क्रेडिट कार्ड वापरून हा फोन खरेदी करू शकतात. कंपनी या फोनवर एक वर्षाची वॉरंटी देखील देते.

JioPhone Next मधील महत्त्वाचे फीचर्स

  • JioPhone Next अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीमच्या ऑप्टिमायझ्ड व्हर्जनवर काम करतो, हे व्हर्जन जिओ आणि गुगलने संयुक्तपणे विशेषतः भारतीय बाजारासाठी विकसित केले आहे.
  • JioPhone नेक्स्ट अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह येतो ज्यामध्ये व्हॉईस असिस्टंट, भाषा अनुवाद, स्क्रीन टेक्स्टचा स्वयंचलित रीड-अलाऊड आणि यात ऑगमेंटेड रिअॅलिटी फिल्टरसह स्मार्ट कॅमेरा आहे.
  • जिओफोन नेक्स्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 215 प्रोसेसरसह लॉन्च होण्याची शक्यता आहे जे 4 जी नेटवर्कला सपोर्ट करते.
  • रिलायन्स जिओ खरेदीदारांसाठी 3 जीबी रॅम प्लस 32GB स्टोरेज व्हेरिएंट लाँच केलं आहे.
  • डिव्हाइसमध्ये HD रिझोल्यूशनसह 5.5 इंच डिस्प्ले आहे.
  • नवीन जिओफोन नेक्स्ट ब्लू व्हेरिएंटसह विविध रंगांमध्ये लॉन्च केला आहे.

JIOPHONE NEXT स्वस्तात खरेदीचे तीन पर्याय

  • पहिला हा ‘ऑलवेज ऑन प्लॅन’ आहे, या प्लॅनमध्ये ग्राहकाला 18 महिन्यांसाठी 350 रुपये आणि 24 महिन्यांसाठी 300 रुपये द्यावे लागतील. प्लॅनमध्ये ग्राहकांना दर महिन्याला 5 GB डेटा आणि 100 मिनिटे व्हॉइस कॉलिंग मिळेल.
  • दुसरा प्लॅन आहे लार्ज प्लॅन, यामध्ये ग्राहकांना 18 महिने 500 रुपये किंवा 24 महिने 450 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा तसेच अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग मिळेल.
  • तिसरा प्लॅन XL प्लॅन आहे, यामध्ये ग्राहकाला दररोज 2 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळेल. या प्लॅनसाठी ग्राहकाला 18 महिने 550 रुपये किंवा 24 महिने 500 रुपये भरावे लागतील.

इतर बातम्या

जगातील पहिला 18GB रॅम स्मार्टफोन ‘या’ दिवशी लॉन्च होणार, जाणून घ्या याची खासियत

तुम्हीही फेसबुक, गूगल अकाऊंटसाठी ‘हा’ पासवर्ड वापरत नाही ना? काही सेकंदात होऊ शकतो हॅक

आता गूगल पे सह पैशाचे व्यवहार सोपे होणार, मिळतील उत्कृष्ट वैशिष्ट्ये


(Online sale of JioPhone Next started on Reliance Digital website, know price and offers)