Oppo चा फोन दुरुस्त करण्यासाठी ग्राहकांना हिंडावं लागणार नाही, कंपनीचा मास्टरप्लॅन तयार

| Updated on: Aug 25, 2021 | 8:11 AM

चीनी स्मार्टफोन निर्माता ओप्पो 2022 पर्यंत आपले सेवा केंद्र (सर्व्हिस सेंटर) नेटवर्क वाढवण्याची योजना आखत आहे. कंपनी भारतात सेवा केंद्रांचे जाळे वाढवण्याचा विचार करत आहे.

Oppo चा फोन दुरुस्त करण्यासाठी ग्राहकांना हिंडावं लागणार नाही, कंपनीचा मास्टरप्लॅन तयार
Follow us on

मुंबई : चीनी स्मार्टफोन निर्माता ओप्पो 2022 पर्यंत आपले सेवा केंद्र (सर्व्हिस सेंटर) नेटवर्क वाढवण्याची योजना आखत आहे. कंपनी भारतात सेवा केंद्रांचे जाळे वाढवण्याचा विचार करत आहे. कंपनीला देशात 600 हून अधिक सर्व्हिस सेंटर्स सुरु करायचे आहेत. आत्तापर्यंत, कंपनीची 500 पेक्षा जास्त सेवा केंद्रे 500 शहरांमध्ये पसरलेली आहेत. कंपनीने अलीकडेच कुडाळ, मोडासा, नांगल, उधमपूर, मयिलादुथुराई, धर्मपुरी, हिंगोली आणि थूटुपुडी यासह अनेक जिल्ह्यांमध्ये सेवा केंद्रांचा विस्तार केला आहे. (Oppo will start 100 more service center in India, company planning to provide extended service to their users)

ओप्पो इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी (चीफ मार्केटिंग ऑफिसर) दमयंत सिंह खानोरिया म्हणाले की, “भारतातील 500 हून अधिक शहरांमध्ये आमच्या आफ्टर-सेल्स सर्विस नेटवर्कचा विस्तार हा ग्राहकांना त्यांच्या उत्पादनांचा एक अद्भुत आणि अद्वितीय अनुभव प्रदान करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

कंपनीने म्हटले आहे की, ते आपल्या वापरकर्त्यांना उत्पादन खरेदी करण्यासाठी अधिक कारणे देण्याचा प्रयत्न करीत आहेत, म्हणून सतत नवीन सेवा सुरू केल्या जात आहे. काउंटरपॉईंट रिसर्चच्या एका अलीकडील अहवालात असे म्हटले आहे की, ओप्पोने विक्रीनंतरच्या सेवेच्या अनुभवात पहिलं स्थान मिळवले आहे, ज्यामध्ये 93 टक्के प्रतिसादकर्त्यांनी त्यांच्या ओप्पोसोबतच्या अनुभवाला खूप चांगला किंवा उत्कृष्ट दर्जा दिला आहे. या व्यतिरिक्त, ओप्पो इंडिया ने ‘ओली’ नावाचे एक समर्पित AI- पॉवर्ड चॅटबॉट देखील सादर केले आहे, जे ग्राहकांना त्यांच्या 94.5 टक्के प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी 24X7 उपलब्ध आहे.

Oppo Reno 6 Pro 5G फोनमध्ये काय आहे खास?

Oppo ने गेल्या महिन्यात बहुप्रतिक्षित ओप्पो रेनो 6 सिरीज सादर केली आहे. ओप्पोची रेनो सिरीज त्याच्या प्रीमियम लूक आणि अपग्रेड केलेल्या वैशिष्ट्यांसह लाँच झाली आहे. रेनो 6 5 जी आणि रेनो 6 प्रो 5 जी (Oppo Reno 6 Pro 5G) ची किंमत 29,990 रुपये आणि 39,990 रुपये इतकी आहे. ऑरोरा आणि स्टेलर ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये हे स्मार्टफोन्स सादर करण्यात आले आहेत.

यात काही टॉप-एंड व्हेरिएंट्स देण्यात आले आहेत, जे 12 जीबी प्लस 256 जीबीसह येतात. ओप्पो रेनो 6 प्रो 5 जी एक ग्लॉसी आणि स्लिम डिझाइनसह सादर करण्यात आला आहे. त्याचे वजन 177 ग्रॅम इतके आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर नाही. या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा 3 डी कर्व्ह डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 180 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटसह देण्यात आला आहे. 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि सिल्की-स्मूद फील सेटअप आहे. टॉप-लेव्हल गेम खेळायचे असतील, अथवा गेम्स स्विच करायचे असल्यास याचा फायदा होतो.

स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 1200 सह लेटेस्ट फ्लॅगशिप 5 जी-इंटीग्रेटेड एसओसीद्वारे सपोर्टेड आहे. जो 6nm प्रोसेसरवर तयार केला गेला आहे. चिपसेटमध्ये आतापर्यंतचा वेगवान स्मार्टफोन ऑक्टा-कोर सीपीयू आहे. मल्टीटास्किंग दरम्यान, स्मार्टफोन अजिबात मागे राहणार नाही आणि त्यात फेस अनलॉकसह डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. यामध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेज देखील आहे. फोन कंपनीच्या कलरओएस 11.3 वर चालतो. हा स्मार्टफोन 4,500 एमएएच बॅटरी पॅकसह येतो आणि 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

इतर बातम्या

आगामी OnePlus 9RT ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या सर्वकाही

108MP कॅमेऱ्यासह Moto Edge 20 बाजारात, मोठ्या डिस्काऊंटसह आज पहिला सेल

50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(Oppo will start 100 more service center in India, company planning to provide extended service to their users)