अनेकदा आपल्याला मेलमधून जुने मेल्स कामासाठी शोधावे लागतात. काही दिवसांपूर्वीचे मेल तर पटकन शोधता येतात पण काही वर्षांपूर्वीचे, जुने मेल शोधायचे असेल तर ? असे मेल शोधणं अवघड होऊन बसते. त्यामुळे मेल बॉक्समध्ये जाऊन खाली-खाली स्क्रोल करण्यापलीकडे दुसरा ऑप्शन आपल्याकडे नसतो. पण हे थोडं वेळखाऊ काम ठरू शकतं. पण आता काळजी करण्याची काही गरज नाही. कारण जुने मेल चुटकीसरशी कसे शोधायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत. यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या मेल सेक्शनच्या सर्च बारमध्ये एक गोष्ट टाईप करून सर्च करावं लागेल. यानंतर सर्व मेल्स लागलीच तुमच्यासमोर येतील
जुना मेल शोधण्यासाठी तुम्हाला फारसं काही करावं लागणार नाही, फक्त जीमेल ओपन करावं लागेल. जीमेल ओपन केल्यानंतर सर्च बारमध्ये जा, सर्चबारमध्ये ‘older_than:4y’ हे टाइप करून सर्च करा, त्यानंतर तुमच्यासमोर अनेक वर्षांपूर्वीचे, जुने मेलही ओपन होतील, तुम्हाला हवी ती फाईल लगेच शोधून ओपन करु शकता.
त्याचप्रमाणे तुम्हाला जरा तीन वर्ष जुने, पाच वर्ष जुने किंवा त्यापेक्षा जुने मेल शोधायचे असतील तर ते सहज शोधू शकतात, यासाठी तासनतास जीमेल मध्ये जाऊन स्क्रोल करावे लागणार नाही.
मल्टीपल इनबॉक्स
अनेक ईमेल आल्यानंतर ते मॅनेज करणे खूप अवघड होऊन बसते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी तुम्ही जीमेल मध्ये मल्टीपल इनबॉक्स तयार करू शकता. यामुळे तुम्ही सहजपणे तुमचे ईमेल मॅनेज करू शकता.
शेड्यूल ई-मेल
तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीला वेळेत मेल पाठवायचा आणि तुम्ही दुसऱ्या कोणत्या तरी कामात असताना वेळेवर मेल पाठवू शकत नसाल तर टेन्शन घेऊ नका. कारण जीमेलचे शेड्यूल फीचर तुम्हाला वेळोवेळी मेल पाठवण्याचे टेन्शन देत नाही. यामध्ये तुम्ही मेलचे टाइम शेड्यूल करू शकता. फक्त पाठवण्याची वेळ सेट करा, तुमचा मेल आपोआप वेळेवर सेंड होईन जाईल.
गुगल कीप इंटिग्रेशन
गुगल कीपसोबत इंटिग्रेट केल्यानंतर तुम्ही ईमेलमध्ये नोट्स तयार करू शकता. यामुळे तुम्हाला ईमेलमधील मुद्दे लक्षात ठेवणे सोपे जाईल. याशिवाय तुम्हाला त्या मेलचे आवश्यक डिटेल्स देखील लक्षात ठेवता येतील.
या ट्रिक्स फॉलो केल्यानंतर तुम्हाला जीमेल वापरणं सोपं होईल, जीमेल वापरण्याचा तुमचा अनुभव देखील बदलेल.