लेबनॉन आणि सीरियामध्ये झालेल्या सीरियल पेजर स्फोटांमुळे हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेला मोठा फटका बसला आहे. ज्यामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3,000 हून अधिक लोकं जखमी झाले आहेत. सीरियामध्ये देखील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच पेजर स्फोटात जखमी झालेल्या अनेक लोकांची प्रकृती चिंताजनक आहे. अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा स्फोट इस्रायलने घडवून आणला असा आरोप होत आहे. लेबनीज संघटना हिजबुल्लाहने यावरुन इस्रायला इशारा देखील दिला आहे. पेजर स्फोट झाल्यापासून पेजर हा चर्चेचा विषय बनला आहे. प्रत्येकजण याबद्दल चर्चा करत आहे. कदाचित भारतातील लोकांना पेजर्सची जास्त माहिती नसेल. हिजबुल्लाहचे दहशतवादी लेबनॉनमध्ये पेजरचा मोठ्या प्रमाणावर वापर करत होते. पेजर हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे, जे संवाद साधण्यासाठी वापरले जाते. पेजरच्या माध्यमातून तुम्ही लहान संदेश पाठवू किंवा प्राप्त करू शकता. पेजरची सुरुवात कशी झाली आणि नंतर त्याची लोकप्रियता कशी कमी होत गेली हे आपण जाणून घेऊयात. पेजरचा इतिहास पेजरचा एकामागे एक स्फोट झाल्यानंतर हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना याचा मोठा...