पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीचे आहे हे प्लॅटफॉर्म

| Updated on: Mar 17, 2025 | 9:27 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलमध्ये सहभागी झाले आहेत. मोदी सोमवारीच या नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आले. त्यानंतर त्यांनी त्यावर पहिली पोस्ट शेअर केली आहे. त्याला आतापर्यंत 10.5 हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीचे आहे हे प्लॅटफॉर्म
trump and pm modi
Image Credit source: टीव्ही 9 भारतवर्ष
Follow us on

अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पॉडकास्टवर तीन तासांची मुलाखत घेतली होती. रविवार प्रसारीत झालेली ही मुलाखत जगभरात चर्चेची ठरली. या मुलाखतीचे कौतूक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील केली. तसेच ही मुलाखत त्यांनी त्यांच्या ट्रुथ या सोशल हँडलवर शेअर केली. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Truth Social ज्वाइन केले आहे. ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्म अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालिकाचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे.

मोदी यांनी का सुरु केले होते हे प्लॅटफॉर्म?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्म सुरु केला होता. त्यामागील कारणही रंजक आहे. जेव्हा जॅक डॉर्सी यांनी त्यांचे ट्विटर (सध्याचे एक्स) अकाउंट संस्पेंड केले होते. त्यामुळे ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल प्लॅटफॉर्म केले होते. त्याला ट्विटरचे क्लोनही म्हटले जाते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी ट्रुथ सोशल लाँच केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलमध्ये सहभागी झाले आहेत. मोदी सोमवारीच या नवीन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आले. त्यानंतर त्यांनी त्यावर पहिली पोस्ट शेअर केली आहे. त्याला आतापर्यंत 10.5 हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. तसेच 1.54 लाखांहून अधिक लोकांनी शेअर केली आहे.

काय आहे वेगळेपण

ट्रुथ सोशल हे फेसबुक आणि ट्विटर यांच्यापेक्षा बरेच वेगळे आहे. फेसबुक मेटाचे प्लॅटफॉर्म आहे. X ची मालकी एलोन मस्क यांच्याकडे आता आहे. ट्रुथ सोशल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या मालकीची आहे. फेसबुकची धोरणे कठोर आहेत. जास्त सेन्सॉरशिप आहे. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रचारासाठी ट्रुथ सोशल हे व्यासपीठ आले आहे. फेसबुकचा वापर जगभरात 3 अब्जाहून अधिक युजर करत आहेत. परंतु ट्रुथ सोशल हे मुख्यत्वे अमेरिकन उजव्या विचारसरणीचे लोकांचे व्यासपीठ आहे. त्याचे यूजर फेसबुकच्या तुलनेत खूपच कमी आहेत.