PPF म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही सध्या देशातील सर्वात लोकप्रिय, दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे. सर्व भारतीयांमध्ये बचतीचा हा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. हा गुंतवणुकीचा (Savings) सुरक्षित पर्याय आहे, जो त्यांना कायमस्वरूपी आकर्षक परताव्याची (Return) हमी देतो. या बचत योजनेत (Savings Scheme) नियमित गुंतवणूक केली, तर काही वर्षांत तो पीपीएफच्या माध्यमातून चांगली संपत्ती गोळा करू शकतो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही सरकार पुरस्कृत अल्पबचत योजना असून यामाध्यमातून अधिक उत्पन्न मिळते. निवृत्तीनंतर गुंतवणुकदारांना दीर्घकालीन संपत्ती निर्माण व्हावी, हा त्यामागचा उद्देश आहे. पीपीएफ हा गुंतवणुकीचा करमुक्त मार्ग आहे. सध्या पीपीएफचा व्याजदर 7.1 टक्के आहे, जो बँकेच्या मुदत ठेवीच्या व्याजदरापेक्षा खूप जास्त आहे.
या योजनेत गुंतवणुकदार वर्षाला किमान 500 रुपयांची गुंतवणूक करू शकतात. या योजनेतील गुंतवणुकीची कमाल रक्कम वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत असू शकते. पीपीएफ ही भारतातील सर्वाधिक परतावा देणाऱ्या योजनांपैकी एक आहे. सध्या पीपीएफचा व्याजदर 7.1 टक्के आहे, जो बँकेच्या मुदत ठेवीपेक्षा खूप जास्त आहे. पीपीएफ ही EEE योजनांपैकी एक आहे जिथे गुंतवणूक, व्याज आणि एकुण रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे.
गुंतवणूकदार त्यांच्या पीपीएफ खात्यात सलग 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. मात्र, 15 वर्षांच्या अखेरीस त्या व्यक्तीला पैशांची गरज नसेल तर तो पीपीएफ खात्याचा कालावधी आणखी वाढवू शकतो. पाच-पाच वर्षांसाठी एक अर्ज भरून ग्राहकाला योजनेचा कालावधी वाढवता येतो.
जर तुम्ही पीपीएफ खात्यात दररोज 33 रुपये गुंतवले तर तुमचे मासिक गुंतवणूक मूल्य सुमारे 1,000 रुपये असेल. म्हणजेच दरवर्षी तुम्ही 12 हजार रुपयांपेक्षा थोडी कमी गुंतवणूक करत आहात. वयाच्या 25 व्या वर्षापासून ते 60 व्या वर्षापर्यंत असं केलं तर एकूण 35 वर्षांनंतर निवृत्तीच्या वेळेपर्यंत या योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 18.14 लाख रुपये मिळतील. ही रक्कम पूर्णपणे करमुक्त असेल आणि मिळणारे एकूण व्याज सुमारे 14 लाख रुपये असेल. आपण 25 वर्षांत जमा केलेली एकूण रक्कम 4.19 लाख रुपये असेल.
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षांचा असतो. खाते उघडल्याच्या तारखेपासून 5 आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यानंतर खातेदार त्यांच्या पीपीएफ खात्यांमधून काही रक्कम काढू शकतो, परंतु काही विशिष्ट परिस्थितीतच. उदाहरणार्थ, जानेवारी 2022 मध्ये पीपीएफ खाते उघडल्यास आर्थिक वर्ष 2027-28 मध्ये तुम्हाला पैसे काढता येतील.15 वर्षांनंतर खाते परिपक्व होईपर्यंत आपण आपल्या पीपीएफ खात्यातून सर्व पैसे काढू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की मुदतपूर्व पैसे काढणे कोणत्याही वेळी आपल्या पीपीएफ खात्याच्या शिल्लक रकमेच्या 100 टक्के असू शकत नाही.