मुंबई : इन्स्टंट मेसेजिंग अॅप म्हणून व्हाट्सअॅप (Whatsapp) लोकप्रिय आहे. मेसेज, फोटो, व्हिडिओ तसेच डॉक्युमेंट पाठवणे आणि इतर फिचर्समुळे युझर्सची पसंती व्हाट्सअॅपला अधिक असते. त्यामुळे व्हाट्सअॅपही सतत अपडेट होतं. आता या प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर आलंय. याच्या मदतीनं युझर्स क्विक रिप्लायचा देऊ शकतात.
व्हाट्सअॅपचं हे नवं फीचर फक्त बिझनेस अकाऊंट असणाऱ्यांसाठी आहे. व्यवसाय करणं सोपं जावं, तसंच छोटे छोटे मेसेज पुन्हा पुन्हा टाइप करण्याच्या त्रासातून यामुळे सुटका होणार आहे. अनेक व्यावसायिक युझर्सना मर्यादित आणि निवडक शब्दांमध्ये उत्तर द्यावं लागतं. यासाठी युझर्सना शॉर्टकटचा पर्याय मिळणार आहे.
कसा सेट करायचा क्विक रिप्लाय?
– व्हाट्सअॅप बिझनेस अॅपचे युझर्स क्विक रिप्लाय क्रिएट करू शकतात
– यासाठी युझर्सला अॅपमध्ये असलेल्या मोअर ऑप्शनवर जावं लागेल. त्यानंतर Business Toolsवर क्लिक करा.
– नंतर Quick Replyवर क्लिक करून Addवर क्लिक करावं.
– यामध्ये क्विक रिप्लाय देण्यासाठी युझर त्यांचा स्वतःचा मेसेज तयार करू शकतो.
– त्यानंतर शेवटी saveवर क्लिक करावं.
बिझनेस अकाऊंट युझर्ससाठी…
WhatsApp बिझनेस अकाउंट युजर्स क्विक रिप्लाय तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे काही क्विक रिप्लाय जनरेट करेल. यामध्ये वापरकर्ते त्यांचं नाव, पत्ता आणि प्रॉडक्टची माहिती इत्यादीदेखील समाविष्ट करू शकतात. यानंतर, जेव्हाही तुम्ही एखाद्याला रिप्लाय देण्यासाठी चॅट ओपन कराल, तेव्हा क्विक रिप्लायचा फायदा घेण्यासाठी यूजर्सला अटॅच ऑप्शनवर क्लिक करावं लागेल, त्यानंतर तुम्ही रिप्लायवर क्लिक करण्याचा फायदा घेऊ शकता. या प्रक्रियेचा वापर करून, युझरचा वेळ वाचेल.
‘ही’ खास फीचर्स येणार लवकरच
व्हाट्सअॅपनं अलीकडेच आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक नवीन फिचर्स दिलीत. सर्वप्रथम युझर्सना ऑडिओ मेसेजसाठी नवीन वेव्हफॉर्म मिळणार आहेत. यामुळे एक वेगळा अनुभव मिळणार आहे. यासह डिसअपिअरिंगचा वेळही वाढणार आहे. फक्त लिमिडेट युझर्सच लास्ट सीन पाहू शकतील.