मुंबई : रियलमी (Realme) चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी आगामी काळात भारतात अनेक स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्यापैकी एक फोन लॉन्च करण्याची तारीख कंपनीने नुकतीच जाहीर केली आहे. कंपनी 7 एप्रिल रोजी भारतात रियलमी 9 4जी (Realme 9 4G) हा फोन सादर करेल, जो कंपनीच्या मार्की सिरीजमधील आगामी फोन असेल. यासोबतच या दिवशी Realme आपला फ्लॅगशिप फोन, रियलमी जीटी 2 प्रो (Realme GT 2 Pro) सह नवीन Realme Book लॅपटॉप भारतात लॉन्च करेल. कंपनी इतरही काही उत्पादनं लाँच करु शकते. Realme 9 4G बद्दल बऱ्याच दिवसांपासून अनेक अंदाज बांधले जात होते. आता कंपनीने लाँच डेट जाहीर केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या फोनचे सर्वात आकर्षक फीचर म्हणजे या फोनचा कॅमेरा. जे युजर्स चांगल्या कॅमेरा फोनच्या शोधात आहेत. अशा युजर्ससाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. कारण Realme 9 4G च्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा असल्याची पुष्टी झाली आहे.
कंपनीने ट्विट पोस्टद्वारे फोनच्या लॉन्चची तारीख जाहीर केली आहे. ज्यामध्ये Realme ने सांगितले की Realme 9 4G ‘9X focusing accuracy’ ऑफर करण्यास सक्षम असेल. फोनमध्ये दिलेला 108 मेगापिक्सेलचा कॅमेरा ग्राहकांना आवडेल.
Realme ने गेल्या वर्षी 108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला पहिला फोन म्हणून 8 Pro लाँच केला होता. Realme 9 4G सह, कंपनी शॉट्स कॅप्चर करण्याचे आणखी काही मार्ग सादर करण्याची योजना बनवू शकते. Realme ने पुष्टी केली आहे की, Realme 9 4G 108 मेगापिक्सेल ISOCELL HM6 इमेजिंग सेन्सर वापरेल जो Samsung ने विकसित केला आहे.
Realme 9 4G 16 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरासह येईल, जो डिस्प्लेवरील पंच-होलच्या कटआऊटमध्ये असेल. टिपस्टर अभिषेक यादवने Realme 9 4G चे एक पोस्टर ट्विट केले आहे. यादवने दिलेल्या माहितीनुसार हा फोन 90Hz रिफ्रेश रेट आणि 360Hz टच सॅम्पलिंग रेटसह AMOLED डिस्प्लेसह सादर केला जाईल.
फोनची बॉडी 7.99mm पातळ असेल आणि या फोनचे वजन 178 ग्रॅम असेल. Realme 9 4G Ripple Holographics Design सह बाजारत दाखल होईल. जे आपण अलीकडेच Realme 9 5G SE मध्ये पाहिलं आहे. हा फोन Sunburst Gold, Stargaze White आणि Meteor Black या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केला जाईल. हा फोन 15 ते 20 हजार रुपयांच्या रेंजमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
Are you ready to #CaptureTheSpark?
Featuring a 108MP ProLight Camera, #realme9 is going to revolutionize the way you click pictures.
Launching at 12:30 PM, 7th April, on our official channels.
Know more: https://t.co/kfGHFQB9m0 pic.twitter.com/MrhSSjO0Qd
— realme (@realmeIndia) April 4, 2022
इतर बातम्या
150W अल्ट्राडार्ट फास्ट चार्जिंगसह Realme GT Neo3 बाजारात, लाँचिंगसाठी उरले काही तास
Apple Down : ॲपलच्या सेवा ठप्प, App Store, Music सह अनेक ॲप्सवर परिणाम
क्वाड कॅमेरा सेटअपसह Samsung चा 5G स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स