Motorola-Xiaomi ला टक्कर, Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह Realme GT 2 Pro बाजारात, उरले फक्त काही तास

| Updated on: Dec 08, 2021 | 5:05 PM

चिनी स्मार्टफोन ब्रँड्समध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरु आहे, जिथे Motorola उद्या स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसरसह येणारा पहिला फोन लॉन्च करणार आहे, तर आता Motorola ला टक्कर देण्यासाठी Realme ने आपला लेटेस्ट फोन Realme GT 2 देखील 9 डिसेंबर रोजी लाँच करण्याची घोषणा केली आहे.

Motorola-Xiaomi ला टक्कर, Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह Realme GT 2 Pro बाजारात, उरले फक्त काही तास
Realme
Follow us on

मुंबई : चिनी स्मार्टफोन ब्रँड्समध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरु आहे, जिथे Motorola उद्या स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसरसह येणारा पहिला फोन लॉन्च करणार आहे, तर आता Motorola ला टक्कर देण्यासाठी Realme ने आपला लेटेस्ट फोन Realme GT 2 देखील 9 डिसेंबर रोजी लाँच करण्याची घोषणा केली आहे. इतकेच नव्हे तर शाओमी 12 सिरीजदेखील 8 Gen 1 चिपसेटसह सादर केला जाईल. हा फोन या महिन्याच्या अखेरीस बाजारात दाखल होऊ शकतो. (Realme GT 2 Pro will launch on 9 december, will compete Moto Edge X30)

Realme GT 2 Pro हा Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह येणारा दुसरा फोन असू शकतो. तर मोटोरोलाचा फोन स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसरसह येणारा जगातील पहिला मोबाइल असणार आहे. तसेच या मोबाईलचा पहिला सेल 15 डिसेंबरला असू शकतो.

Realme GT 2 Pro चे संभाव्य स्पेसिफिकेशन

Realme GT 2 Pro च्या संभाव्य स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, या मोबाईलमध्ये 6.51 इंचाचा AMOLED फुलएचडी प्लस डिस्प्ले दिला जाईल. यात 120hz रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळेल. तसेच, यात इन-स्क्रीन फिंगरप्रिंट स्कॅनर मिळेल. तसेच, यात प्री-इंस्टॉल केलेले रियलमी UI 3.0 स्किन्ड Android 12 मिळेल.

Realme GT 2 Pro मध्ये 125W फास्ट चार्जर मिळण्याची शक्यता

Realme GT 2 Pro ला पॉवर देण्यासाठी, 5000mAh क्षमतेची बॅटरी मिळेल. ज्यामध्ये 125W फास्ट चार्जिंग उपलब्ध असेल. ज्यामुळे हा फोन चार्ज करण्यासाठी युजरला फार वेळ मोबाईल चार्जिंगला लावून बसावं लागणार नाही.

Realme GT 2 Pro चा कॅमेरा सेटअप

Realme GT 2 Pro च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या बॅक पॅनलवर OIS-ready 50 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स 766 सेन्सर दिला आहे. सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे, तर तिसरा कॅमेरा 5 मेगापिक्सेल डेप्थ/मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा उपलब्ध असेल.

Realme GT 2 Pro मध्ये 12GB रॅम

Realme GT 2 Pro मध्ये LPDDR5 RAM 12 GB पर्यंत उपलब्ध असेल. तसेच, यात 256 GB UFS 3.1 स्टोरेज मिळेल.

इतर बातम्या

Redmi Note 10S चं नवीन स्टोरेज व्हेरिएंट भारतात लाँच, किंमत…

8GB/128GB, 50MP कॅमेरासह Vivo Y55s बाजारात, लाँचिंगसाठी उरले फक्त काही तास

Iphone 12 vs Iphone 13 : फक्त किंमत आणि कॅमेराच नव्हे तर आणखी बरेच फरक, जाणून घ्या तुमच्यासाठी परफेक्ट मॉडेल कोणतं?


(Realme GT 2 Pro will launch on 9 december, will compete Moto Edge X30)