मुंबई : Realme ने नुकतेच आपले दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यामध्ये Realme GT Neo 2T आणि Realme Q3S चा समावेश आहे. हे दोन्ही स्मार्टफोन स्वतःमध्ये खास आहेत. या स्मार्टफोनमध्ये अनेक चांगले फीचर्स आणि मजबूत हार्डवेअर देण्यात आले आहे. MediaTek Dimension 1200AI चिपसेट Realme GT Neo 2T मध्ये वापरण्यात आला आहे, जो OnePlus Nord 2 मध्ये देखील वापरला गेला आहे. (Realme GT NEO 2T and Realme Q3s launched in china, ckeck price and feature)
Realme GT NEO 2T मध्ये 6.43 इंचांचा सॅमसंग एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 1080 x 2400 पिक्सेल इतका आहे. तसेच, त्याचा रिफ्रेश रेट 120hz आहे, जो गेमिंग आणि स्क्रोलिंगसाठी उपयुक्त आहे. हा डिस्प्ले 1000 एनआयटी पीक ब्राइटनेस देतो. Realme फोनमध्ये MediaTek Dimensity 1200AI चिपसेट वापरण्यात आला आहे, जो आधी वनप्लस नॉर्ड 2 मध्ये पाहायला मिळू शकतो. या फोनमध्ये 12 GB पर्यंत RAM आणि 256 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज स्पेस मिळेल. यात व्हर्च्युअल रॅमचा पर्यायही आहे.
Realme GT NEO 2T च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर यात बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सेलचा आहे. सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा आहे. तसेच यात 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. हा फोन नुकताच चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे आणि त्याची सुरुवातीची किंमत 2,099 युआन (जवळपास 24,609 रुपये) इतकी आहे. यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहे.
Realme Q3s मध्ये 6.6-इंचांचा HDR10 LCD डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144 Hz आहे, जो स्क्रोलिंग आणि गेमिंगमध्ये मदत करतो. यासोबत या फोनमध्ये 2412 × 1080 फुलएचडी प्लस रिझोल्यूशन डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा पीक ब्राईटनेस 600 nits इतका आहे. या फोनमध्ये 778G 5G प्रोसेसर देण्यात आला आहे.
Realme Q3s च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. 2 मेगापिक्सेल बॅक कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलची मॅक्रो लेन्स देखील आहे. त्यात लेटेस्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे आणि तो एआय सेन्स रिकग्निशनसह येतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन नुकताच चीनमध्ये लाँच झाला आहे आणि त्याची सुरुवातीची किंमत 1499 युआन (जवळपास 17,547 रुपये) इतकी आहे.
इतर बातम्या
12GB/256GB, 50MP बॅक, 32MP सेल्फी कॅमेरासह Vivo X70 स्मार्टफोन बाजारात, किंमत…
Xiaomi च्या स्लिम, लाइटवेट 5G फोनवर 1500 रुपयांचा डिस्काऊंट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर
(Realme GT NEO 2T and Realme Q3s launched in china, ckeck price and feature)