मुंबई : चीनची स्मार्टफोन निर्माती कंपनी Realme ने नुकतेच भारतात दोन ढासू स्मार्टफोन लाँच केले आहेत. Realme X7 5G आणि Realme X7 Pro 5G अशी या दोन स्मार्टफोन्सची नावं आहेत. काही वेळापूर्वी एका व्हर्चुअल इव्हेंटमध्ये हे दोन्ही फोन लाँच करण्यात आले आहेत. (Realme X7 Pro 5G and Realme X7 5G launched in India; check price and specification)
कंपनीने Realme X7 5G हा स्मार्टफोन भारतात दोन स्टोरेज वेरिएंटमध्ये सादर केला आहे. यामध्ये 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंट आणि 8GB रॅम + 128GB स्टोरेज वेरिएंटचा समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही फोन्सची किंमत अनुक्रमे 19,999 रुपये आणि 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
Realme X7 5G च्या दोन वेरिएंट्ससोबत कंपनीने Realme X7 Pro 5G हा स्मार्टफोनही लाँच केला आहे. या फोनची किंमत 29,999 रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये तुम्हाला 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज स्पेस मिळेल. कंपनीने हे स्मार्टफोन्स फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड प्रोग्रामअंतर्गत सादर केले आहे. या स्मार्टफोन्सचा पहिला सेल 10 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या स्मार्टफोनमध्ये सुपर AMOLED फुल HD डिस्प्ले देण्यात आला आहे, जो MediaTek Dimensity 800U प्रोसेसरसह येतो. यामध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज स्पेस देण्यात आला आहे. तसेच फोटोग्राफीसाठी यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यामध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच या फोनमध्ये 50W सुपरडार्ट चार्जिंग सपोर्टसह 4310mAh क्षमतेची बॅटरी दिली जाईल.
Introducing #realmeX7
?Dimensity 800U 5G Processor
?50W SuperDART Charge
?64MP AI Triple CameraAvailable in:
?6+128GB, ₹19,999
?8+128GB, ₹21,9991st sale at 12 PM, 12th Feb on https://t.co/HrgDJTZcxv & @Flipkart.#XperienceTheFuture pic.twitter.com/4Jnb4SMNm5
— realme (@realmemobiles) February 4, 2021
Realme X7 Pro च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये MediaTek Dimensity 1000+ प्रोसेसर देण्यात आला असून यामध्ये सुपर एमोलेड डिस्प्लेदेखील आहे. याचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिला ग्लास 5 ने कोटेड आहे. सोबतच या फोनमध्ये 4 रियर कॅमेरे देण्यात आले आहेत. याचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे जो Sony IMX686 सेन्सरसह येतो. सोबतच यामध्ये 8MP ची वाईड अँगल लेन्स, 2MP ची रेट्रो पोट्रेट लेन्स आणि 2MP ची मॅक्रो लेन्स मिळाली आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. पॉवरसाठी या स्मार्टफोनमध्ये 4,500mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 65W अल्ट्रा फास्ट फ्लॅश चार्जिंग सपोर्टसह येते.
Meet #realmeX7Pro with:
? Dimensity 1000+ 5G Processor
? 120Hz Super AMOLED Fullscreen
? 65W SuperDart Charge
? Sony 64MP Quad Camera with IMX686 SensorPriced at ₹29,999. 1st sale at 12 PM, 10th Feb on https://t.co/HrgDJTZcxv & @Flipkart.https://t.co/Z9ILNYSvCv pic.twitter.com/xC7KNKvL0H
— realme (@realmemobiles) February 4, 2021
दक्षिण कोरियाई स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंगने (Samsung) आज भारतात त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केला. हा स्मार्टफोन Samsung च्या गॅलेक्सी M सिरीजमधील दुसरा मोबाईल आहे, त्यामुळे कंपनीने या स्मार्टफोनचे नाव Samsung Galaxy M02 असं ठेवलं आहे. या फोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ इन्फिनिटी V डिस्प्ले आणि 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 6999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.
या डुअल नॅनो सिमवाल्या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ इनफिनिटी V डिस्प्ले देण्यात आला आहे जो MediaTek SoC प्रोसेसरसह येतो. कंपनीने Samsung Galaxy M02 हा स्मार्टफोन दोन वेरिएंट्समध्ये सादर केला आहे. ज्यामध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनचा आणि 3GB रॅम प्लस 32GB स्टोरेज स्पेस असलेल्या स्मार्टफोनचा समावेश आहे. या फोनमधील स्टोरेज स्पेस मायक्रो एसडी कार्डद्वारे 1TB पर्यंत वाढवता येईल.
सोबतच या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Samsung Galaxy M02 हा स्मार्टफोन कंपनीने ब्लॅक, ग्रे, ब्लू आणि रेड या कलर ऑप्शन्ससह सादर केला आहे. हा स्मार्टफोन Android 10 वर बेस्ड One UI वर चालतो. या फोनला पॉवर देण्यासाठी यामध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी 10W च्या स्टँडर्ड चार्जिंग सपोर्टसह येते. तसेच कनेक्टिविटीसाटी गॅलेक्सी M02 मध्ये 4G LTE, Wi-Fi, ब्लुटूथ, GPS/ A-GPS आणि USB Type-C port देण्यात आला आहे.
The #realmeX7Pro features:
? MediaTek Dimensity 1000+ 5G Processor
? 120Hz Super AMOLED Fullscreen
? 65W SuperDart Charge
? Sony 64MP Quad Camera with IMX686 SensorStarting at ₹29,999. Sale at 12 PM, 10th Feb on https://t.co/HrgDJTHBFX & @Flipkart.https://t.co/Z9ILNZa715 pic.twitter.com/z6R4Fnecwt
— realme (@realmemobiles) February 4, 2021
तुम्ही पिऊन चालवू नका, आम्ही घरी पाठवू, Uber घरपोच मद्य पोहोचवणार!
6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरासह POCO चा ‘हा’ स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त…
डुअल रियर कॅमेरा, 5000mAh च्या बॅटरीसह Samsung चा स्वस्तातला स्मार्टफोन लाँच
Vodafone-Idea ची ढासू ऑफर, 50 रुपयांच्या डिस्काऊंटसह दररोज 1.5GB डेटा मिळणार
(Realme X7 Pro 5G and Realme X7 5G launched in India; check price and specification)