मुंबई : शाओमी इंडियाने (Xiaomi India) आज आपला नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 10 टी 5 जी (Redmi Note 10T 5G) भारतात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन Redmi Note 10 series मधील पाचवं मॉडेल आहे. या series मध्ये कंपनीने यापूर्वी Redmi Note 10, Redmi Note 10 Pro, Redmi Note 10 Pro Max आणि Redmi Note 10S सादर केले आहेत. (Redmi Note 10T 5G launched in India at starting price of Rs 13999, check features)
Redmi Note 10T 5G युरोपात लाँच झालेल्या Redmi Note 10 5G आणि Poco M3 Pro 5G चं रिब्रँडेड व्हर्जन आहे. या स्मार्टफोनचं 4 जीबी + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 13,999 रुपये आणि 6 जीबी + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 15,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आलं आहे. हा फोन क्रोमियम व्हाइट, ग्रेफाइट ब्लॅक, मेटॅलिक ब्लू आणि मिंट ग्रीन रंगात सादर करण्यात आला आहे. ग्राहक 26 जुलैपासून हा स्मार्टफोन Amazon, Mi.com, Mi Home स्टोर्स तसेच ऑफलाइन किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदी करू शकतात.
कंपनीने Redmi Note 10T 5G स्मार्टफोनच्या लाँचिंगसह सोबतच अनेक लाँचिंग ऑफर्सदेखील सादर केल्या आहेत. ज्यामध्ये HDFC Bank क्रेडिट कार्डद्वारे शॉपिंग केल्यास 1000 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे. तसेच कंपनीने नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरची सुविधादेखील देऊ केली आहे.
हा ड्युअल सिम (नॅनो) स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर आधारीत MIUI वर चालतो. यात 6.5 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे जो 90Hz च्या रीफ्रेश रेटसह येतो. या डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 20: 9 इतका आहे. हा फोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी 700 एसओसी द्वारा सपोर्टेड आहे आणि त्यासह 6 जीबी रॅम देण्यात आला आहे. या फोनच्या कॅमेर्याविषयी सांगायचे तर त्यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
कनेक्टिव्हिटीबद्दल सांगायचे झाल्यास यात 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS, Infrared (IR) blaster, NFC, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. यासह, यात एसिलिरोमीटर, एम्बिएंट लाइट सेन्सर, गायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5,000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18W फास्ट चार्जिंग (बॉक्समध्ये 22.5W चार्जर) सपोर्टसह येते.
इतर बातम्या
(Redmi Note 10T 5G launched in India at starting price of Rs 13999, check features)