मुंबई : रेडमी नोट 11 या महिन्याच्या अखेरच्या दिवसात लॉन्च होईल, ज्याची माहिती कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे. या सिरीजअंतर्गत लॉन्च केलेले स्मार्टफोन वेगवेगळ्या प्रकारचे असतील आणि अनेक विशेष फीचर्ससह सुसज्ज असतील, असे कंपनीने म्हटले आहे. Redmi Note 10 सिरीज भारतात मार्च मध्ये लाँच करण्यात आली होती, ज्या अंतर्गत तीन फोन सादर करण्यात आले होते, त्यापैकी Redmi Note 10 Pro Max होता आणि यामध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला होता. (Redmi Note 11 series to be launched on October 28, know what will be special in new phone)
रेडमीने चीनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट Weibo वर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. स्मार्टफोनशी संबंधित डिझाईन या फोटोंमध्ये दाखवण्यात आले आहेत. तसेच काही तपशील देखील उपलब्ध आहे. या फोनच्या बॅक पॅनेलवर आयताकृती कॅमेरा सेटअप असेल आणि समोर पंच होल कॅमेरा उपलब्ध असेल. स्मार्टफोनला 3.5 मिमी हेडफोन जॅक मिळेल, जो यावेळी वरच्या बाजूला असेल. यासोबत स्पीकर ग्रिल आणि IR ब्लास्टर असतील.
कंपनीने या पोस्टर्सवर नोट 11 सिरीजचा उल्लेख केला आहे. जसा आपण रेडमीचा कल पाहतो, ते प्रत्येक वेळी रेडमी नोट सीरीज अंतर्गत दोन किंवा तीन स्मार्टफोन लाँच करतात. त्याच प्रकारे, या वेळी शक्यतो तीन स्मार्टफोन Redmi Note 11, Redmi Note 11 Pro, Redmi Note 11 Pro Max असे तीन फोन लाँच केले जाऊ शकतात.
या वर्षी रेडमी नोट 11 च्या प्रो व्हेरिएंटमध्ये MediaTek Dimensity 920 चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच, याला 120Hz चा रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळेल. लीक्सनुसार, या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी मिळू शकते, जी चार्जिंगसाठी 67W किंवा 120W चार्जरसह येईल.
Redmi Note 11 मध्ये MediaTek Dimension 810 चिपसेट दिला जाऊ शकतो, ज्याला 120hz LCD स्क्रीन दिली जाऊ शकते. यात 5000 mAh ची बॅटरी देखील मिळेल, ज्यामध्ये 33W फास्ट चार्जर उपलब्ध असेल. रेडमी नोट 11 मध्ये 6 जीबी रॅम आणि 8 जीबी वेरिएंट्स सादर केले जाऊ शकतात. ही सिरीज भारतात कधी लाँच केली जाईल, याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
इतर बातम्या
स्ट्राँग बॅटरी, रिव्हर्स चार्जिंगसह Vivo Y3s (2021) भारतात लाँच, किंमत 9499 रुपयांहून कमी
दमदार प्रोसेसर, फास्ट चार्जरसह Realme चे दोन स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स
Samsung ची विक्री जैसे थे, तरीही ठरला जगातील अव्वल स्मार्टफोन ब्रँड, Apple, Xiaomi ला पछाडलं
(Redmi Note 11 series to be launched on October 28, know what will be special in new phone)