iPhone सोबत चार्जर घेऊन फिरण्याचे दिवस संपणार, 5730 वर्ष चालणारी डायमंड बॅटरी

| Updated on: Dec 18, 2024 | 9:52 PM

Diamond Battery use in iphone:जगातील पहिली न्यूक्लियर-डायमंड बॅटरी बनवण्यात आली आहे. या बॅटरीमध्ये हिऱ्याच्या आतामध्ये कार्बन-14 नावाचा रेडिओएक्टिव्ह पदार्थ वापरण्यात येत आहे. त्यामुळे या बॅटरीची लाईफ एक, दोन वर्षे नाही तर 5730 वर्ष असणार आहे.

iPhone सोबत चार्जर घेऊन फिरण्याचे दिवस संपणार, 5730 वर्ष चालणारी डायमंड बॅटरी
Diamond Battery use in iphone
Follow us on

Diamond Battery use in iphone: स्मार्टफोनसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटमध्ये कॉपर बॅटरी वापरली जाते. त्यासंदर्भातील माहिती अनेकांना आहे. परंतु डायमंड बॅटरीसंदर्भात तुम्हाला काही माहिती आहे का? डायमंड बॅटरी डिव्हाईसमध्ये लावल्यावर डिव्हाईसची लाईफ 5730 वर्षांपर्यंत आहे. आता जगातील पहिली न्यूक्लियर-डायमंड बॅटरी बनवण्यात आली आहे. या बॅटरीमध्ये हिऱ्याच्या आतामध्ये कार्बन-14 नावाचा रेडिओएक्टिव्ह पदार्थ वापरण्यात येत आहे. त्यामुळे या बॅटरीची लाईफ एक, दोन वर्षे नाही तर 5730 वर्ष असणार आहे. म्हणजेच 5 हजार वर्ष ही बॅटरी चालणार आहे.

कोणी बनवली डायमंड बॅटरी?

हजारो वर्षे टिकणारी डायमंड बॅटरी इंग्लंडमध्ये बनवण्यात आली आहे. इंग्लंडच्या ब्रिस्टल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी जगातील पहिली आण्विक-डायमंड बॅटरी तयार केली आहे. किरणोत्सर्गी सामग्री आणि हिरा मिळून वीज निर्माण करतात. ही बॅटरी चालवण्यासाठी कोणत्याही मोशनची गरज भासणार नाही. या संशोधनामुळे मोबाईलमध्ये क्रांतीच येणार आहे. दीर्घकाळ चालणाऱ्या बॅटऱ्या विविध प्रकारच्या गॅझेटमध्ये येऊ शकणार आहे.

आयफोनमध्ये डायमंड बॅटरी

आयफोन किंवा कोणत्याही छोट्या इलेक्ट्रॉनिक उपकरणात डायमंड बॅटरी वापरली तर चार्जर किंवा कोणत्याही प्रकारची पॉवर बँक सोबत ठेवण्याची गरज भासणार नाही. जर तुमच्याकडे असणाऱ्या डिव्हाइसचे आयुष्य जास्त असेल, तर ही बॅटरी हजारो वर्षे चालू शकणार आहे.

हे सुद्धा वाचा

डायमंड बॅटरी सामान्य किंवा वीज निर्माण करणाऱ्या कोणत्याही मशीनपेक्षा अनेक पटींनी चांगली आहे. या बॅटरीमध्ये रेडिएशन असतात, त्यामुळे इलेक्ट्रॉन वेगाने फिरतात. या प्रक्रियेतून वीजनिर्मिती होते. हे सौर यंत्रणेप्रमाणे काम करते. या बॅटरीसाठी खरोखर डायमंड वापरे जाते का? तर त्याचे उत्तर होय आहे. किरणोत्सर्ग रोखण्यासाठी कार्बन-14 डायमंडचा वापर केला जातो. हे कोणत्याही घन पदार्थात सहजपणे शोषले जाऊ शकते. यामुळे रेडिएशनचा धोका कमी होतो आणि नुकसान होण्याची शक्यता कमी होते.