मुंबई : भारतातील सर्वात मोठा मोबाईल ब्रँड असलेल्या सॅमसंगमध्ये भारतातील Galaxy S23 सिरीजसाठी विक्रमी प्री-बुकिंग झाल्या आहेत. 24 तासांत 140,000 ग्राहकांनी Galaxy S23 मोबाईलचे प्री-बुकिंग केले आहे. जो सॅमसंगचा एक नवीन विक्रम आहे. सॅमसंगने आपल्या नवीन Galaxy S23 सिरीजसाठी, 2 फेब्रुवारी रोजी देशातील ऑनलाइन आणि ऑफलाइन रिटेल स्टोअरमध्ये प्री-बुकिंग सुरू केली होती.
Galaxy S23 सिरीजचा हा फोन भारतात लाँच होताच त्याची मागणी वाढली आहे. पहिल्या 24 तासांत विक्रमी बुकिंग कंपनीला मिळाली आहे. Galaxy S23 सिरीजचा कॅमेरा अनेक ग्राहकांसाठी आकर्षण ठरत आहे. मोबाइल गेमिंगचा अनुभव आणि पर्यावरणपूरक साहित्य याविषयी भारतीय ग्राहकांमध्ये उत्साह दिसत आहे. Galaxy S23 सिरीज, नोएडा फॅक्टरीमध्ये तयार केला जाणार आहे. जी भारताबद्दल आमची बांधिलकी दर्शवते, असे सॅमसंग इंडियाचे वरिष्ठ संचालक आदित्य बब्बर यांनी म्हटले आहे.
Galaxy S23 Ultra अॅडॉप्टिव्ह पिक्सेलसह सर्व-नवीन 200 एमपी सेन्सरसह उपलब्ध आहे. सुपर क्वाड पिक्सेल AF सह, बॅक कॅमेरा, सब्जेक्टवर 50% अधिक वेगाने फोकस करू शकतो. Galaxy S23 सिरीज वरील फ्रंट कॅमेरा आता नाइटोग्राफीसह ड्युअल पिक्सेल ऑटोफोकस तंत्रज्ञानासह उपलब्ध आहे, जो कमी प्रकाशातही समोरच्या कॅमेर्यावरून रेकॉर्ड करतो. ड्युअल पिक्सेल, ऑटोफोकस तंत्रज्ञान, समोरच्या कॅमेऱ्यातून 60% अधिक वेगाने फोकस याची
ठळक वैशिष्टे आहे.
Galaxy S23 सिरीज वरील व्हिडिओ, रात्री देखील चांगला इफेक्ट देते. ज्यामध्ये सुपर HDR, वर्धित नॉईज कंट्रोल अल्गोरिदम आणि 2X ओआयएस आहे. जो व्हिडिओ अधिक सिनेमॅटिक बनतात.
Galaxy S23 सिरीज मध्ये Galaxy मध्ये स्नॅपड्रॅगन® 8 जेन 2 मोबाइल प्लॅटफॉर्म आहे, जे जगातील सर्वात वेगवान मोबाईल ग्राफिक्स डिस्प्ले करते.
Galaxy S23 सिरीज, मोबाईल गेमिंग अनुभव उच्च पातळीवर घेऊन जाते. Galaxy S23Ultra मुख्य प्रवाहातील मोबाइल गेमिंगसाठी रिअल-टाइम रे ट्रेसिंगला सपोर्ट करते.
Galaxy S23 सिरीजला फोर जनरेशनचे ओएस (OS) अपग्रेड आणि पाच वर्षांचे सुरक्षा अपडेट मिळतील. Galaxy S23 सिरीज, सॅमसंग नॉक्स (Samsung Knox) संरक्षणासह उपलब्ध आहे. ज्याने इतर कोणत्याही मोबाइल डिव्हाइस, प्लॅटफॉर्म किंवा बाजारातील सोल्युशनपेक्षा, अधिक सरकारी आणि उद्योग प्रमाणपत्रे प्राप्त केली आहेत.
Galaxy S23 सिरीजसाठी प्री-बुक, 2 फेब्रुवारीपासून सर्व आघाडीच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन किरकोळ स्टोअरमध्ये सुरू होईल. ग्राहक, 2 फेब्रुवारी, 2023 पासून https://www.samsung.com/in/live-offers/ येथे सॅमसंग लाइव्ह वर प्री-बुक करू शकतात.
Galaxy S23Ultra (12/1TB)
INR 154999
फैंटम ब्लैक, क्रीम, ग्रीन
Galaxy S23Ultra (12/512GB)
INR 134999
Galaxy S23Ultra (12/256GB)
INR 124999
Galaxy S23+ (8/512GB)
INR 104999
फैंटम ब्लैक, क्रीम
Galaxy S23+ (8/256GB)
INR 94999
Galaxy S23(8/256GB)
INR 79999
फैंटम ब्लैक, क्रीम, ग्रीन, लैवेंडर
Galaxy S23(8/128GB)
INR 74999
Galaxy S23Ultra चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल – रेड, ग्रेफाइट, लाइम आणि स्काय ब्लू – फक्त Samsung.com वर.
प्री-बुक ऑफर्स
Galaxy S23Ultra चे प्री-बुकिंग करणार्या ग्राहकांना, गॅलक्सी वॉच4 एलटीई आणि गॅलक्सी बड्स, 2 रु. 4999 च्या विशेष किमतीत मिळू शकतात. Galaxy S23+ चे प्री-बुकिंग करणार्या ग्राहकांना रु. 4999 च्या विशेष किमतीत Galaxy वॉच4 बीटी मिळेल. याव्यतिरिक्त, सर्व ग्राहक, ऑनलाइन चॅनेलवर रु. 8000 चा बँक कॅशबॅक घेऊ शकतात.
Galaxy S23 सिरीज च्या खरेदीवर ग्राहक 24 महिने नो कॉस्ट ईएमआय देखील निवडू शकतात. जे 2 फेब्रुवारी, 2023 रोजी सॅमसंग लाइव्ह दरम्यान Galaxy S23 सिरीजचे प्री-बुक करतील, त्यांना वायरलेस चार्जर आणि ट्रॅव्हल अडॅप्टरची अतिरिक्त भेट मिळेल. 2 फेब्रुवारी रोजी https://www.samsung.com/in/live-offers/ येथे “सॅमसंग लाइव्ह” इव्हेंट दरम्यान, Galaxy S23 सिरीजची प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना वायरलेस चार्जर आणि ट्रॅव्हल अडॅप्टरची अतिरिक्त खास भेट मिळेल.