आयफोन घेण्याचे अनेक स्वप्न असते. परंतु अनेक जण किंमत जास्त असल्यामुळे आयफोन घेऊ शकत नाही. काही जण सेंकड हँड आयफोन घेण्याचा प्लॅन करतात. सेंकड हँड फोन घेणे काही चुकीचे नाही. ही डिल सुद्धा फायद्याची होऊ शकते. परंतु सेकंड हँड फोन घेण्यापूर्वी काही गोष्टी चेक करणे गरजेच्या आहेत. अन्यथा तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. अर्ध्यापेक्षा जास्त पैसे तुमचे हा फोन दुरुस्त करण्यात जाईल. यामुळे सेंकड हँड आयफोन घेताना काय काळजी घ्यावी…
आयफोनच नव्हे तर कोणताही सेंकड हँड फोन घेताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खरेदीचा पुरावा तपासून घेणे आहे. त्या फोनचे बिल चेक करायला हवे. ओरिनिजल बिलाची हार्ड कॉपी किंवा शॉफ्ट कॉपी काहीही चालू शकते. अनेक वेळा फोन वारंटीमध्ये असतो. जर तुम्हाला फोनची ओरिजनल बिल मिळाले तर तुम्ही या सर्व गोष्टी चेक करु शकतात.
फोन वारंटीमध्ये आहे का? हे तपासण्यासाठी सर्वात आधी आयफोनच्या सेटींगमध्ये जा. त्या ठिकाणी जनरल ऑप्शनमध्ये जा. त्यानंतर अबाउट सेक्शनवर क्लिक करा. या ठिकाणी iPhone चा सिरियल नंबर तुम्ही चेक करु शकतात. हा सिरियल नंबर कॉपी करुन checkcoverage.apple.com वर टाकल्यावर सर्व डिटेल्स मिळतील.
कोणत्याही फोनसाठी चांगली बॅटरी अत्यावश्यक आहे. आयफोनसाठी त्याची बॅटरीची परिस्थिती खूप महत्वाची आहे. आयफोनची बॅटरीची हेल्थ ८० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास तो आयफोन विकत घेण्यास काहीच हरकत नाही. परंतु त्यापेक्षा कमी असल्यास विचार करुन निर्णय घ्या. आयफोनची बॅटरी चेक करण्यासाठी आयफोनच्या सेटींगमध्ये जा. त्या ठिकाणी बॅटरीचा पर्याय असले. त्याला क्लिक करा. Battery health and charging वर क्लिक करा. जर तुम्ही बॅटरीची हेल्थ चेक करु शकत नसाल तर तो आयफोन नकली आहे.
लेटेस्ट आयफोन लागलीच तपासून घेत येईल. आयफोनच्या डिस्प्ले अनऑफिशियल सर्व्हिस सेंटरवर रिप्लेस किंवा रिपेयर तर केला नाही, हे तपासता येते. त्यासाठी आयफोनच्या सेटींगमध्ये जा. डिस्प्ले आणि ब्रायटनेसवर क्लिक करा. आता तुम्ही ट्रू टोन एक्टिव्ह करु शकता. जर ते एक्टिव्ह झाले नाही तर आयफोन रिपेयर केल्याची शक्यता अधिक आहे.