आपल्या वादग्रस्त भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले स्नॅपचॅट (Snapchat) पुन्हा एकदा वादात सापडले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या स्नॅपचॅटने वाद उफाळून आल्यानंतर माओरी टॅटू फिल्टर (Maori tattoo filter) काढून टाकला आहे. स्नॅपचॅटच्या या फिल्टरमुळे न्यूझीलंडच्या स्थानिक समुदायामध्ये नाराजी पसरली होती, त्यानंतर स्नॅपचॅटने हे फिल्टर आपल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकले आहे. माओरी लोक त्यांची टॅटू कला पवित्र मानतात आणि ते परिधान करणार्यांच्या ओळखीचे एक महत्त्वाचे चिन्ह म्हणून घेतले जाते. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानंतर निर्माण झालेल्या वादामुळे स्नॅपचॅटने हे पाऊल उचलले. रेडिओ न्यूझीलंडने (Radio New zealand) माओरी फेस टॅटू आणि माओरी यासारख्या नावांसह इन्स्टाग्रामवर फिल्टर लागू करणाऱ्या यूझर्सचे फोटो दाखवले. यानंतर स्नॅपचॅटने हे फिल्टर त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आल्याचे जाहीर केले आहे.
कंपनी लेन्सच्या स्वरूपात स्नॅपचॅट फिल्टर्स ऑफर करते. हे यूझर्सना ओपन-सोर्स सॉफ्टवेअर लुकरी वापरून रिअल टाइममध्ये त्यांचा लूक सुधारण्याची परवानगी देते. ही लेन्स यूझर्सने व्युत्पन्न केली आहे आणि ती इतर प्लॅटफॉर्मवर मुक्तपणे शेअर आणि वापरली जाऊ शकते.
स्नॅपने बीबीसीला दिलेल्या निवेदनात सांगितले, की आम्ही आमच्या समुदायाला मार्गदर्शक तत्त्वांनुसार लेन्स तयार करण्यास प्रोत्साहित करतो. हे काम संपूर्ण नियमांनुसार केले जाते. न्यूझीलंडच्या स्थानिक माओरी समुदायाचे चेहऱ्यावरील टॅटू किंवा मोको हे शतकानुशतके माओरी संस्कृतीचा भाग असल्याचे मानले जाते. ते एका महत्त्वाच्या विधीमध्ये छिन्नी वापरून त्वचेवर कोरले जातात. ही एक अभिमानाची बाब माओरी समुदायामध्ये गणली जाते. मात्र अशाप्रकारे फोटो फिल्टरमध्ये ती वापरल्याने काही वाद निर्माण झाला. शेवटी कंपनीला हे फीचर मागे घ्यावे लागले.
स्नॅपचॅटचे सीईओ इव्हान स्पीगल यांनी 2015मध्ये म्हटले होते, की हे अॅप फक्त श्रीमंत लोकांसाठी आहे. मला भारत आणि स्पेनसारख्या गरीब देशांमध्ये याचा विस्तार करायचा नाही. या वक्तव्यानंतर मोठा वाद झाला होता. त्यानंतर अनेक भारतीयांनी स्नॅपचॅट अनइन्स्टॉल केले होते.