हे पाच स्मार्टफोन इतरांकडून अनलॉक होणं अशक्य

| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : मोबाईल कंपन्यांनी स्मार्टफोन युजर्ससाठी ‘फेस रिकॉग्निशन’ हे एक नवीन फीचर आणलं आहे. या फेस रिकॉग्निशन सिस्टमद्वारे स्मार्टफोन अनलॉक होतो. फेस रिकॉग्निशन या फीचरमुळे स्मार्टफोनच्या सुरक्षिततेत वाढ झाली आहे. त्यामुळे तुमचा स्मार्टफोन हरवल्यास किंवा चोरी गेल्यास तो अनलॉक करणे कठीण आहे. मोबाईल कंपन्या आता अनलॉक सिस्टम फ्रंट फेसिंग कॅमेऱ्यामध्ये विकसित करत आहेत. मात्र, अशा काही मोजक्या स्मार्टफोन कंपन्या […]

हे पाच स्मार्टफोन इतरांकडून अनलॉक होणं अशक्य
Follow us on

मुंबई : मोबाईल कंपन्यांनी स्मार्टफोन युजर्ससाठी ‘फेस रिकॉग्निशन’ हे एक नवीन फीचर आणलं आहे. या फेस रिकॉग्निशन सिस्टमद्वारे स्मार्टफोन अनलॉक होतो. फेस रिकॉग्निशन या फीचरमुळे स्मार्टफोनच्या सुरक्षिततेत वाढ झाली आहे. त्यामुळे तुमचा स्मार्टफोन हरवल्यास किंवा चोरी गेल्यास तो अनलॉक करणे कठीण आहे.

मोबाईल कंपन्या आता अनलॉक सिस्टम फ्रंट फेसिंग कॅमेऱ्यामध्ये विकसित करत आहेत. मात्र, अशा काही मोजक्या स्मार्टफोन कंपन्या आहेत की, त्यांनी फ्रंट फेसिंग कॅमेरा सिस्टममुळे  फोनच्या मालकाशिवाय इतरांना हा फोन अनलॉक करता येत नाही.

ऑनर प्ले

ऑनर प्ले या फोनची किंमत 19,999 रूपये आहे. फोनमध्ये 3डी फेशियल स्कॅनिंग AI सिस्टमचा समावेश करण्यात आला आहे. या सिस्टमनुसार फेस रिकॉग्निशनमध्ये लाईटनिंग कंडिशनचा उपयोग होतो. यामुळे  स्मार्टफोन अनलॉक करताना समोरच्या व्यक्तीला लक्षात येत नाही. यामध्ये 16 मेगापिक्सल कॅमेराचा वापर केला आहे.

रिअल मी 2 प्रो

रिअल मी 2 प्रो या फोनची किंमत 15,990 रूपये आहे. रिअल मी 2 प्रोमध्ये ही फेस अनलॉक ऑप्शन आहे. यातही 16 मेगापिक्सल कॅमेरा आहे. त्यामुळे स्मार्टफोन लगेच अनलॉक होतो.

ओप्पो F9

ओप्पो F9 या फोनची किंमत 18,990 रूपयांपर्यंत आहे. या फोनमध्ये फेस रिकॉग्निशनसाठी 16 मेगापिक्सल कॅमेरा आहे. तसेच फिंगरप्रिंट सेंसरने ही कॉल उचलता येतो.

 

वीवो V9 प्रो

वीवो V9 प्रो ची किंमत 15,990 रूपये आहे. या फोनची फेस अनलॉक सिस्टम चांगली आहे. मात्र, हा फोन लवकर अनलॉक करण्यासाठी कॅमेरा चेहऱ्यासमोर असणं गरजेचं आहे. यातही 16 मेगापिक्सल कॅमेराचा समावेश केला आहे.

मोटोरोला वन पॉवर

मोटोरोलाने नुकताच लाँच केलेला मोटोरोला वन पॉवर 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. यामुळे फेस रिकॉग्निशन सिस्टीम सपोर्ट करते. अँड्राईड 9.0 च्या अपडेटनंतर मोटोरोला वन मधील सर्व स्मार्टफोनमध्ये फेस रिकॉग्निशन सिस्टीम काम करेन.