भारतात विविध कंपन्यांचे शेकडो मोबाईल उपलब्ध आहेत. अॅमेझॉन (Amazon) तसेच फ्लिपकार्ट या प्लॅटफॉर्मवरुन तुम्ही विविध पर्याय डोळ्यासमोर ठेवून स्मार्टफोनची खरेदी करु शकतात. आज आम्ही या लेखातून तब्बल 108 मेगापिक्सल (108 megapixel) कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनबद्दलची माहिती देणार आहोत. या सेगमेंटमध्ये मोटोरोला, रिअलमी, रेडमी सारखे मोठ्या ब्रँडचेही पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहेत. विशेष म्हणजे या मोबाईल्सची किंमतदेखील अगदी स्वस्त आहे. केवळ 20 हजार रुपयांमध्ये ग्राहकांना हे दमदार फिचर्स (Features) असलेले स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
1) मोटोरोला : या मोबाईलमध्ये 108 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. याची किंमत 16000 रुपयांपेक्षा कमी आहे. यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. सोबत यामध्ये 6.78 इंचाची फुल एचडी प्लस डिसप्ले देण्यात आली आहे. बॅक पॅनल ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे.
2) रेडमी : रेडमी नोट 11एस या स्मार्टफोनला केवळ 16200 रुपयांमध्ये खरेदी केले जाउ शकते. यात 6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आल आहे. सोबत याला 6.43 इंचाचा डिसप्ले आहे. यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे.
3) रिअलमी : रिअमली 9 हा 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला सर्वाधिक स्वस्त फोन आहे. यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. सोबतच यात 6.4 इंचाची फूल एचडी प्लस एमोलेड डिसप्ले देण्यात आला आहे. यात 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
4) मोटोरोला एज 20 फ्यूजन 5जी : हा मोबाईल फ्लिपकार्टवरुन 21699 रुपयांना खरेदी करता येतो. हा फोन 5जी सपोर्ट आणि 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. 108 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
5) सॅमसंग गॅलेक्सी एम53 5जी : हा फोन केवळ 26999 रुपयांमध्ये उपलब्ध अआहे. याला बॅक पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 108 मेगापिक्सल कॅमेरा आहे. सोबत सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलला फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 6.7 इंचाचा डिसप्ले आहे.