मुंबई : बाजारात अँड्रोइड स्मार्टफोनसाठी (Android smartphone) विविध प्रकारचे गेमिंग ॲप्स उपलब्ध आहेत. यातीलच एक प्रसिध्द असा बॅटेल ग्राउंड मोबाईल इंडियन (Battle Ground Mobile Indian) नावाचा गेम आहे. याचेच जुने नाव पबजी राहिले आहे. याशिवाय अनेक गेमदेखील खूप प्रसिध्द आहे. परंतु मोबाईलवर असे गेम खेळताना पाहिले तसा ‘फील’ येत नसल्याने काही लोकांकडून लॅपटॉपवर अतिशय थरारक पध्दतीने गेमिंग करण्यात येत असते. अशा लोकांसाठी आज या लेखातून काही बजेट गेमिंग लॅपटॉपबाबची (Gaming laptop) माहिती देणार आहोत. या लॅपटॉपना तुम्ही ऑैफलाईनसह अॅमेझॉन तसेच फ्लिपकार्टवरुनही खरेदी करु शकणार आहात.