पाकिस्तानातही TikTok बॅन, अश्लीलता पसरवण्याबाबत आरोप, हायकोर्टाकडून बंदीचे आदेश

| Updated on: Jun 29, 2021 | 4:36 PM

भारतात बंदी घातल्यानंतर बरोबर एक वर्षानंतर आता पाकिस्तानातही Tik Tok वर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानातील हायकोर्टाने Tik Tok वर तात्पुरती बंदी घातली आहे.

पाकिस्तानातही TikTok बॅन, अश्लीलता पसरवण्याबाबत आरोप, हायकोर्टाकडून बंदीचे आदेश
TikTok
Follow us on

इस्लामाबाद : भारतात बंदी घातल्यानंतर बरोबर एक वर्षानंतर आता पाकिस्तानातही Tik Tok वर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानातील हायकोर्टाने Tik Tok वर तात्पुरती बंदी घातली आहे. चिनी व्हिडीओ-शेअरिंग अॅपविरोधात याचिका ऐकून सिंध उच्च न्यायालयाने पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणास (पीटीए) पुढील सुनावणी होईपर्यंत चीनी अॅप निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील सुनावणी 8 जुलै रोजी होणार आहे. हे अॅप पाकिस्तानात ‘अनैतिकता आणि अश्लीलता पसरवत आहे’, या कारणास्तव त्यावर तात्पुरत्या निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. (TikTok suspended in Pakistan once again)

या वर्षात पाकिस्तानात दुसऱ्यांदा या अॅपवर बंदी घालण्यात आली आहे. मार्चमध्ये पेशावर हायकोर्टाने (PHC) अनेक नागरिकांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर अशीच कारवाई केली होती. तथापि, कोणतीही ‘अनैतिक सामग्री’ (Immoral content) अपलोड केली जाऊ नये, अशा सूचनेसह पीटीएने काही उपाययोजना करण्यास सांगितले. आणि 10 दिवसांनंतर ही बंदी उठवली. ऑक्टोबरमध्ये, पीटीएला टिकटॉकवरील अश्लील आणि अनैतिक कंटेटबद्दलच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पीटीएने टिकटॉकवर बंदी घातली.

यापूर्वीदेखील पाकिस्तानात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली होती

पाकिस्तानचे चीनशी 1951 पासून चांगले संबंध आहेत. दोन्ही देशांनी वारंवार केवळ सैन्य सहकार्यच केले नाही तर आर्थिक-सामाजिक क्षेत्रातही सहकार्य केले आहे. चीनमध्ये डॉयिन या नावाने ओळखले जाणारे टिकटॉक हे अॅप चिनी कंपनी बाईटडन्सच्या मालकीचं आहे. ही एक चीनी व्हिडिओ शेअरिंग सोशल नेटवर्किंग सर्व्हिस आहे.

कोर्टाचे उत्तर

कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, अॅप कंपनी पाकिस्तानच्या नियमांचा आणि कायद्यांचा आदर करत नाही, तसेच त्यांचे पालनदेखील करत नाही. या दोन्ही गोष्टींचे पालन करण्यात कंपनी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. इस्लाम आणि पाकिस्तानची संस्कृती समजण्यातही कंपनी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की, पाकिस्तानमध्ये टिकटॉकचे 30 मिलियन म्हणजेच 3 कोटी युजर्स आहेत.

टिकटॉकवर अनेक देशांमध्ये बंदी

आतापर्यंत अनेक देशांनी टिकटॉक या प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे किंवा बंदी घालण्याची धमकी दिली आहे. जून 2019 मध्ये, भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने टिकटॉकवर बंदी घातली होती. भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता, भारताचं संरक्षण आणि सार्वजनिक सुव्यवस्थेच्या सुरक्षेसाठी हे अॅप हानिकारक आहे, असे म्हणत यावर बंदी घालण्यात आली. 2020 मध्ये त्यावरील बंदी कायम करण्यात आली, ती बंदी अद्याप कायम आहे.

संबंधित बातम्या

TikTok भारतात परतणार? बंदीनंतरही सरकारच्या सर्व डिजीटल नियमांचे पालन

कर चुकवल्याच्या आरोपावरुन टिकटॉकची मूळ कंपनी बाइटडान्सची बँक खाती फ्रिज

(TikTok suspended in Pakistan once again)