हिवाळा सुरु झाला असून या ऋतूत योग्य रूम हीटर निवडणे आवश्यक आहे. छोट्या खोल्यांसाठी छोटे हीटर आणि मोठ्या खोल्यांसाठी मोठे हीटर, सर्व प्रकारचे हीटर अनेक इलेक्ट्रॉनिक दुकान तसेच इ कॉमर्स साईडवर उपलब्ध आहेत. आजकाल थंडीच्या दिवसात हीटर खूप महत्वाचं झालं आहे. थंडीच्या दिवसात घरासाठी आम्ही तुम्हाला काही खास योग्य हीटरची माहिती सांगणार आहोत, जेणेकरून तुम्ही तुमच्या घरी योग्य हिटर आणून तुमचा घर उबदार आणि आरामदायक राहील. कोणते आहेत हे हिटर जाणून घेऊयात.
ओरिएंट इलेक्ट्रिक अरेवा पोर्टेबल हीटर
हा हिटर २००० वॅट पॉवरचा आहे आणि यात तुम्हाला हिटर हिट करण्यासाठी दोन पर्याय देण्यात आले आहे. तसेच हा हिटर वजनाने अगदी हलका असून वापरण्यास एकदम सोपा आहे. यात असे काही ऑटोमॅटिक फिचर आहेत जेव्हा हिटर जास्त गरम होतो तेव्हा आपोआप बंद होईल, म्हणून ते लहान ते मध्यम आकाराच्या खोल्यांसाठी चांगले आहे. हा हिटर तुम्ही भिंतीवर देखील लावू शकता, परंतु कधीकधी त्यात काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. तर या हिटरची किंमत १,२९९ रुपये इतकी आहे.
उषा हीट कॉनवेक्टर ४२३ एन
हा हिटर लहान ते मध्यम आकाराच्या खोल्यांसाठी एक चांगला हीटर आहे. यात तीन हीटिंग सेटिंग्ज आहेत. हे खोलीतील गरम हवा चांगल्या प्रकारे प्रसारित करते आणि खूप गरम असताना आपोआप बंद होते. तथापि काही लोकांना आवाज थोडा जास्त वाटू शकतो. याची किंमत २,३३५ रुपये आहे.
हॅवेल्स कम्फर्टर रूम हीटर
हॅवेल्स कम्फर्टर रूम हीटर हा एक चांगला हीटर आहे ज्यामध्ये तापमान समायोजन वैशिष्ट्य आहे जे जास्त गरम झाल्यावर आपोआप बंद होते. यात २००० वॅट पॉवर आहे, त्यामुळे लहान ते मध्यम आकाराच्या खोल्यांसाठी चांगले आहे. याची किंमत ३,७९० रुपये आहे.
ऑर्पॅट ओईएच -१२६०
ऑर्पॅट ओईएच हा हिटर लहान ते मध्यम आकाराच्या खोल्यांसाठी चांगले हीटर आहे. यात दोन हीटिंग सेटिंग्ज आहेत आणि खूप पॉवरफुल आहे. यात सेफ्टी नेट असते आणि जास्त गरम झाल्यावर आपोआप बंद होते.याची किंमत १,५४० रुपये आहे.
क्रॉम्प्टन इन्स्टा कम्फर्ट हीटर
हा हिटर लहान खोल्यांसाठी एक चांगला हीटर आहे. यात तापमान समायोजित करण्याचे वैशिष्ट्य आहे आणि जेव्हा ते जास्त गरम होते तेव्हा आपोआप बंद होते. याचे डिझाईन मॉडर्न आणि लाइटवेट आहे, पण जास्त वापरल्यास त्याचे आयुष्य कमी होऊ शकते. याची किंमत १,६२० रुपये आहे.