Marathi News Technology Top smartphone with 50mp camera vivo t1 5g realme c35 infinix note 11 samsung galaxy f23 5g redmi note 11
Vivo ते Redmi, 10 हजार रुपयांच्या रेंजमधले 50MP कॅमेरावाले टॉप 5 स्मार्टफोन
भारतात Vivo पासून Redmi पर्यंत अनेक स्मार्टफोन आहेत, जे वेगवेगळ्या फीचर्ससह येतात. ज्यामध्ये चांगले रॅम आणि स्टोरेज पर्याय आहेत. पण आज आम्ही तुम्हाला 50 मेगापिक्सल कॅमेरा लेन्स असलेल्या आगामी स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत.
1 / 6
भारतात Vivo पासून Redmi पर्यंत अनेक स्मार्टफोन आहेत, जे वेगवेगळ्या फीचर्ससह येतात. ज्यामध्ये चांगले रॅम आणि स्टोरेज पर्याय आहेत. पण आज आम्ही तुम्हाला 50 मेगापिक्सल कॅमेरा लेन्स असलेल्या आगामी स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत. हे मोबाइल फोन फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि स्थानिक बाजारातून खरेदी करता येतील.
2 / 6
Vivo T1 5G नुकताच भारतात लॉन्च करण्यात आला आहे. या मोबाईलची सुरुवातीची किंमत 15,990 रुपये आहे. या किंमतीत 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. या मोबाईलच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
3 / 6
Realme C35 हा फोन 11,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन 4 GB रॅम आणि 64 GB इंटर्नल स्टोरेजसह येतो. यामध्ये 1 TB पर्यंतचे SD कार्ड जोडता येते. या फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेल आहे. यात 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
4 / 6
Infinix Note 11 फ्लिपकार्टवरून 10499 रुपयांना खरेदी करता येईल. तसेच यात 4 GB रॅम आणि 64 GB इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. हा फोन 6.7 इंचाच्या डिस्प्लेसह येतो. तसेच, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा आहे. यात 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
5 / 6
Samsung Galaxy F23 5G मध्ये, 1 TB पर्यंतचे SD कार्ड इन्सर्ट केले जाऊ शकते. याच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. तसेच यात 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. या मोबाईलमध्ये 5000mAh बॅटरी आहे. यात स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर देण्यात आला आहे.
6 / 6
Redmi Note 11 हा फोन 14115 मध्ये खरेदी करता येईल. या फोनमध्ये 6 GB रॅम आणि 64 GB इंटर्नल स्टोरेज स्पेस आहे. तसेच, यात 6.43 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 50 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे.