देशातील 122 कोटी टेलिकॉम युजर्सच्या सुरक्षेसाठी दूरसंचार विभाग आणि TRAI यांनी बनावट टेलिमार्केटिंग कॉलविरोधात लढा तीव्र केला आहे. TRAI ने गेल्या महिन्यात एक नवीन धोरण लागू केले जे थेट ऑपरेटर स्तरावर मार्केटिंग आणि फेक कॉलब्लॉक करण्याची परवानगी देते, ज्यामुळे व्हाईटलिस्टिंगची आवश्यकता नाहीशी होते.
बनावट कॉल रोखण्यासाठी सरकारी दूरसंचार विभागाने कडक पावले उचलली आहेत. नुकतेच विभागाने 1 कोटी 77 लाख मोबाइल क्रमांक बंद केले. येत्या काही दिवसांत आणखी सिमकार्ड ब्लॉक केले जातील, असे सरकारचे म्हणणे आहे. ही त्यांच्या मोहिमेची सुरुवात असल्याचे विभागाने म्हटले आहे.
कारवाईची ही पहिली वेळ नाही
लायकॉम विभागाने फेक कॉलर्स बंद करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी लाखो सिमकार्ड बंद केले होते. फेक कॉल रोखण्यासाठी विभाग कठोर पावले उचलत आहे. यापुढे कॉलर्सना फक्त व्हाईटलिस्टेड टेलिमार्केटिंग कॉल्स मिळतील.
फेक कॉलविरोधात कारवाई तीव्र
देशातील 122 कोटींहून अधिक टेलिकॉम युजर्सच्या सुरक्षेसाठी दूरसंचार विभागाने ट्रायच्या सहकार्याने हे पाऊल उचलले आहे. त्यांनी मिळून फेक कॉलविरोधात कारवाई तीव्र केली आहे. TRAI ने गेल्या महिन्यातच नवे धोरण तयार केले आहे, जेणेकरून ऑपरेटर्स आता स्वतःहून मार्केटिंग आणि फेक कॉल थांबवू शकतील. यामुळे आता व्हाईटलिस्टिंगची गरज भासणार नाही.
45 लाख बनावट आंतरराष्ट्रीय कॉलला रोखले
दूरसंचार विभागात कार्यरत असलेल्या चार टेलिकॉम सर्व्हिस ऑपरेटर्सनी (टीएसपी) 45 लाख बनावट आंतरराष्ट्रीय कॉलला टेलिकॉम नेटवर्कपर्यंत पोहोचण्यापासून रोखले होते.
आणखी सिमकार्ड ब्लॉक करणार
अलीकडेच दूरसंचार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, बँका आणि पेमेंट वॉलेटने सुमारे 11 लाख खाती गोठवली आहेत. येत्या काही दिवसांत आणखी सिमकार्ड ब्लॉक केले जातील, असे सरकारचे म्हणणे आहे.
1.35 crore spoof calls blocked 🚫
1.77 crore mobile numbers engaged in frauds, disconnected ❌
14-15 lakh mobile phones traced📱#SafeDigitalIndia pic.twitter.com/n3ERSfv5nw
— DoT India (@DoT_India) November 10, 2024
फसवणुकीचे कॉल करणाऱ्यांचा शोध
फसवणुकीचे कॉल करणाऱ्या सुमारे 14 ते 15 लाख मोबाईल फोनचा त्यांनी शोध घेतला आहे. युजर्सच्या चिंतेला प्रतिसाद देत विभागाने तातडीने कारवाई करत गेल्या पाच दिवसांत सुमारे 7 कोटी कॉल ब्लॉक करण्यात यश मिळवले आहे.
यूआरएल किंवा एपीके लिंक मेसेज ब्लॉक करणार
आता कॉलर्सना केवळ व्हाईटलिस्टेड टेलिमार्केटिंग कॉल येणार आहेत. तसेच, यूआरएल किंवा एपीके लिंक असलेले मेसेज नेटवर्क स्तरावर ब्लॉक केले जातील. तथापि, व्हाईटलिस्टेड मेसेजस फेक कॉल म्हणून वर्गीकृत केले जाणार नाही.