मुंबई : ट्विटरने (Twitter) जाहीर केले आहे की त्यांचे युजर्स लवकरच सिक्युरिटी कीजचा (Security Key) वापर करु शकतील, तथापि, हे केवळ सर्टिफिकेशन मेथड म्हणून शक्य होईल. मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरने म्हटले आहे की, युजर्स आता केवळ एकच नाही तर बर्याच सिक्युरिटी कीजचा वापर करु शकतील. (Twitter Security key can be used as an authentication method)
सध्या, ट्विटर युजर्स साइन इन करण्यासाठी फक्त एक सिक्युरिटी की वापरू शकतात. तसेच दुसरी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन पद्धत म्हणून एक ऑथेंटिकेटर अॅप किंवा एसएमएस कोड आवश्यक आहे. कंपनीने ट्वीट करून म्हटले आहे की, “अनेक सिक्युरिटी की वापरुन तुम्ही तुमचं ट्विटर अकाऊंट अधिक सुरक्षित ठेवू शकता. आता तुम्ही मोबाईल आणि वेब दोन्हीवर एकापेक्षा अधिक सुरक्षा की वापरून लॉग इन करू शकता. ”
सिक्युरिटी किंवा सुरक्षा कीज या फिजिकल कीज असतात, ज्या यूएसबी किंवा ब्ल्यूटूथच्या मदतीने कनेक्ट केलेल्या असतात. ऑनलाइन सोशल मीडिया अकाऊंट्सचे संरक्षण करण्यासाठी त्या अधिक सुरक्षित मार्गाने तयार केल्या आहेत. टू-फॅक्टर सर्टिफिकेशन म्हणजे ट्विटर अकाऊंट्ससाठी सिक्युरिटी की ही एक एक्स्ट्रा लेअर आहे.
Secure your account (and that alt) with multiple security keys. Now you can enroll and log in with more than one physical key on both mobile and web.
And coming soon: the option to add and use security keys as your only authentication method, without any other methods turned on.
— Twitter Support (@TwitterSupport) March 15, 2021
आता ट्विटरदेखील फेसबुक ग्रुपसारखे फीचर घेऊन येणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हे फीचर लाँच झाल्यानंतर ट्विटरवरील युजर्स एखाद्या विषयासह एक ग्रुप तयार करू शकतात किंवा प्रत्येकाला आवडेल असाच कॉन्टेंट त्यामध्ये पोस्ट करू शकतील. हे फीचर फेसबुकसारखेच असेल. म्हणजे, जर तुम्हाला एखाद्या ग्रुपमध्ये एखाद्या चित्रपटाविषयी बोलायचे असेल तर तुम्ही त्या ग्रुपमध्ये तुमचं मत मांडू शकता आणि इतर युजर्सना ती वाचता-पाहता येतील.
दरम्यान, ट्विटर सध्या सेफ्टी मोडवरही काम करत आहे, जर कोणतेही ट्विट हानिकारक असल्याचे सिद्ध झाले तर ट्विटर ते त्वरित हटवेल किंवा संबंधित व्यक्तीचे अकाऊंट ब्लॉक करेल.
इतर बातम्या
स्टेटस पाहिलंय की नाही हे समोरच्याला समजणार नाही; WhatsApp ची भन्नाट ट्रिक
सावधान! गुगल क्रोमच्या Incognito मोडमध्येही तुमचा डेटा ट्रॅक होतो, कंपनीवर 3600 कोटींचा खटला
WhatsApp मध्ये लवकरच जबरदस्त नवे फिचर्स; मल्टी डिव्हाईस सपोर्टसह Instagram Reels लुटता येणार आनंद!
(Twitter Security key can be used as an authentication method)