मुंबई : अलीकडच्या काळात ट्विटरने (Twitter) सेलेब्स आणि माध्यमांमध्ये काम करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात ‘ब्लू टिक’ वितरित केल्या आहेत. त्यामुळे तुम्हालाही आता तुमच्या ट्विटर अकाऊंटसाठी ब्लू टिक हवी असेल तर तुम्ही दुर्दैवी आहात. कारण ट्विटरने इच्छुक वापरकर्त्यांचे अर्ज आणि पुनरावलोकन प्रक्रियेतील (रिव्ह्यू प्रोसेस) सुधारणांमुळे पडताळणी प्रक्रिया तात्पुरती थांबवली असल्याची पुष्टी केली आहे. (Twitter stops blue tick verification process once again)
ट्विटर व्हेरिफाईड हँडलने आपल्या वापरकर्त्यांशी नुकताच संपर्क साधला आहे आणि लोकांना प्रक्रिया सुधारित होईपर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे. मात्र ही प्रक्रिया कधी सुरु होईल याबाबत कोणत्याही तारखेचा उल्लेख करण्यात आलेला नाही, याचा अर्थ असा होऊ शकतो की, आपल्याला काही आठवडे किंवा कदाचित महिने याची प्रतीक्षा करावी लागेल. ट्विटरने नॉन-व्हेरिफाईड युजर्सना प्रतीक्षा करण्यास सांगितले आहे. तसेच ही सेवा लवकरात लवकर परत आणण्याचे आश्वासन दिले आहे.
ट्विटरने आपल्या ताज्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आम्ही व्हेरीफिकेशनसाठी अर्ज करण्यासाठी रोल आउट प्रवेश तात्पुरता थांबवला आहे. जेणेकरून आम्ही अर्ज आणि रिव्ह्यू प्रोसेस सुधारू शकू. जे प्रतीक्षा करत आहेत त्यांच्यासाठी हे खूपच निराशाजनक असू शकते, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. आम्हाला काही गोष्टी दुरुस्त करायच्या आहेत, त्यामुळे आम्ही तुमच्या संयमाचे कौतुक करतो.
एका वापरकर्त्याने विचारले की, ब्लू टिकसाठीची प्रक्रिया सुरु करण्यास किती वेळ लागेल, तेव्हा कंपनीने उत्तर दिले की, “अधिक लोकांना अर्ज करण्याचा पर्याय देण्यापूर्वी आम्ही अप्लाय आणि पुनरावलोकन प्रक्रियेत (रिव्ह्यू प्रोसेस) काही सुधारणा लागू करण्यासाठी काम करत आहोत. आम्ही पुन्हा यासाठीचा अॅक्सेस सुरू केल्यावर सर्वांना कळवू. काळजी करू नका, आम्ही शक्य तितक्या लवकर प्राप्त झालेल्या सर्व अर्जांचा रिव्ह्यू करण्याचे काम करत आहोत.
इतर बातम्या
टिकटॉकवर आपण असे बदलू शकता आपले वय, वापरकर्त्यांसाठी डिझाईन केले हे खास वैशिष्ट्य
Whatsapp वेब, डेस्कटॉप युजर्सना फोटो एडिटिंगपासून ते डिसअपियरर्यंतचे सगळे फीचर्स मिळणार!
(Twitter stops blue tick verification process once again)